व्यापाऱ्यांची चिनी उत्पादनाविरुद्ध मोहीम

Traders Campaign Against Chinese Products
Traders Campaign Against Chinese Products

नागपूर, : चिनी उत्पादनांच्या बहिष्काराची मोहीम अखिल भारतीय किरकोळ व्यापारी महासंघाने (कॅट) उघडली असून, दहा जूनपासून त्याला सुरुवात केली जाणार आहे. डिसेंबर 2021 पर्यंत देशभरात "भारतीय सामान, हमारा अभिमान' ही मोहीम राबविणार आहे. या माध्यमातून चीनमधून होणारी आयात 1.5 लाख कोटींनी कमी करण्याचा या अभियानाचा प्रयत्न राहणार आहे. चीनमधील कोणतीही वस्तू खरेदी करू नका, असे आवाहन व व्यापक प्रचार या अभिनाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये करण्यात येणार आहे. 

चिनी वस्तूंचा बहिष्कार करण्याचे आवाहन सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात केले जात आहे. आता व्यापारी महासंघानेही त्यात उडी घेतली आहे. चिनी ऍप, सॉफ्टवेअर, ऍण्टी व्हायरस, आयटी आणि इलेक्‍ट्रॉनिक्‍स उत्पादनांविरोधात बहिष्कारास्त्र उगारले आहे.

कोरोनाचा जगभरात प्रादुर्भाव झाल्यानंतर चीनविरुद्ध चीड व्यक्त होत आहे. अशातच भारत-चीन सीमेवर निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर चिनी उत्पादरांविरोधातील लढ्यात आता व्यापाऱ्यांनीही उडी घेतली आहे. कुठल्याही प्रकारच्या चिनी उत्पादनांची विक्री न करण्याचा निर्णय कॅटने घेतला आहे. 

सणासुदीसाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तूमध्ये चिनी वस्तूंचा वापर देशात वाढला होता. त्यामुळेच चिनी उत्पादनांच्या विक्रीविरुद्ध सातत्याने लढा देण्यात येत आहे. आता हा लढा अधिक तीव्र करण्यात येणार आहे. त्यात भारतीय उत्पादकांनी सहभाग घेतला आहे. ट्विटरवर अमूल विरुद्ध चीन असा ट्रेंड सध्या कायम आहे. चिनविरोधातील या लढ्याला व्यापाऱ्यांनी बळ देण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेच्या माध्यमातून चीनमधून होणारी आयात 1.5 लाख कोटींनी कमी करण्याचा या अभियानाचा प्रयत्न राहणार आहे. मोहिमेत व्यापाऱ्यांनी चिनी उत्पादने विकू नये. याशिवाय ग्राहकांनी स्वदेशी वस्तू, उत्पादने विकत घेण्यावर भर द्यावा, असा प्रयत्न करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार "लोकल ते व्होकल'ला पुढे नेण्यात येणार आहे. 2001 मध्ये चिनी उत्पादनांची आयात दोन अरब डॉलर होती. 

2019मध्ये ती 70 अरब डॉलरपर्यंत पोहचली. मागील 20 वर्षांत आयात 35 टक्‍क्‍यांनी वाढली आहे. चीनहून तीन हजार प्रकारची वेगवेगळी उत्पादने मोठ्या प्रमाणात आयात होतात. स्वस्त दरामुळे त्यांना चांगली मागणी आहे. त्याविरुद्ध सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. 2018 मध्ये 'मेक इन इंडिया'मुळे चीनहून होणारी आयात सहा अरब डॉलरने कमी झाल्याची माहिती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतिया व महासचिव प्रवीण खंडेलवाल यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com