माहिती लपवून समाजाचे शत्रू बनू नका : तुकाराम मुंढे

tukaram mundhe
tukaram mundhe

नागपूर : काही दिवसांपूर्वी सतरंजीपुरा येथील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली. या एका व्यक्तीमुळे थेट संपर्कातील तसेच इतर एकूण 37 जणांना कोरोना विषाणूने कवेत घेतले. आतापर्यंत 192 संशयितांची तपासणी करण्यात आली असून, 144 जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. आणखीही संशयितांचा शोध घेणे सुरू आहे. या व्यक्तीच्या संपर्कातील नागरिकांनी स्वतःहून माहिती द्यावी, असे आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले.

महापालिकेच्या प्रसिद्धी विभागाने आयुक्त तुकाराम मुंढे यांचा व्हिडिओ आज जारी केला. यातून आयुक्तांनी नागरिकांना माहिती लपवून स्वतःचे व समाजाचे शत्रू बनू नका, असे आवाहन केले. वैज्ञानिकदृष्ट्या एका माणसापासून हजार लोकांपर्यंत कोरोनाचा संसर्ग होतो, असे नमूद करीत आयुक्तांनी सतरंजीपुऱ्यातील एका कोरोनाबाधित व्यक्तीमुळे संपूर्ण परिसर धोक्‍यात आल्याचे सांगितले. या व्यक्तीच्या कुटुंबात 21 सदस्य असून, त्यापैकी 15 निगेटिव्ह आहेत. एक पॉझिटिव्ह असून, पाच जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. त्यानंतर या व्यक्तीने दुकानदार, डॉक्‍टर, नर्स, औषधी विक्रेत्यापर्यंतही मजल मारली. त्यांची संख्या 19 आहे. त्यापैकी सर्वांची चाचणी निगेटिव्ह आली.

आतापर्यंत संपर्कातील 192 जण संशयित 
संपर्कातील डॉक्‍टर व नर्सची पहिली चाचणी निगेटिव्ह आली. मात्र, दुसऱ्या चाचणीत नर्स पॉझिटिव्ह आढळून आली. त्यामुळे या डॉक्‍टर व नर्सच्या क्‍लिनिकमध्ये 14 दिवसांत किती रुग्ण तपासणीसाठी आले, त्यांचा शोध सुरू असल्याचे आयुक्त मुंढे यांनी सांगितले. याशिवाय ही व्यक्ती आजारी असताना त्यांच्याकडे 42 शेजारी, नातेवाईक भेटायला आले. अशाप्रकारे या व्यक्तीच्या थेट संपर्कातील 83 लोकांना शोधण्यात आले. त्यापैकी 37 पॉझिटिव्ह असून, 11 निगेटिव्ह आहेत, अशी माहिती आयुक्तांनी दिली. या व्यक्तीच्या थेट संपर्काव्यतिरिक्त चेनमुळे कोरोना संशयितांची संख्या आतापर्यंत 192 झाली. आता 144 जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. या सर्व व्यक्तींनी महापालिकेच्या सर्वेक्षणासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना योग्य माहिती दिली नसल्याने हे अघटित घडल्याची खंत आयुक्तांनी व्यक्त केली. 

दररोज 83 हजार नागरिकांची तपासणी 
कोरोनाचा प्रभाव असलेले शहरातील 9 परिसर सील करण्यात आले. त्यापैकी 4 परिसर सील करून 14 दिवस झाले असून तेथे कुणालाही लक्षणे आढळली नाही. त्यामुळे तेथील नागरिकांना थोडा दिलासा मिळाला. मात्र, पाच परिसरातील नागरिकांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. हा भाग संवेदनशील असल्याने येथे सलग 14 दिवस मनपा सर्वेक्षण करीत आहे. पाच झोनमध्ये 24 डॉक्‍टरांच्या नेतृत्वात 271 पथके दररोज 19 हजार 443 घरांतील सर्वेक्षणातून 83 हजार 61 नागरिकांची विचारपूस केली जात असल्याचेही आयुक्तांनी नमूद केले.

'तो' बरा होण्याची वाट पाहू अन्‌ आम्ही तिघेही सोबत घरी जाऊ, त्यांनी केला संकल्प...
 

महापालिकेचे कर्मचारी, अधिकारी जीव धोक्‍यात घालून नागरिकांची माहिती घेत आहेत. परंतु, नागरिक माहिती देत नसल्याने ही परिस्थिती ओढवली. जे कोरोना संशयितांच्या संपर्कात आले असतील, त्यांनी माहिती लपवून समाजाचे शत्रू बनू नये. माहिती लपविणाऱ्यांमुळे आज नागपूर रेड झोनमध्ये आले. त्यामुळे आस्थापना, उद्योग सुरू करण्याबाबत सध्या विचार करू शकत नाही. नागरिकांनी कोरोना संशयिताच्या संपर्कात आले असेल तर तत्काळ माहिती द्यावी. 
- तुकाराम मुंढे, आयुक्त, मनपा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com