तुकाराम मुंढेंचा दणका, मनपा कर्मचा-याला केले बडतर्फ.... वाचा कारण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

2002 ते 2007 च्या दरम्यान सुध्दा 15 लक्ष रुपयाचा अपहार केला होता. त्यासाठी त्यांना निलंबीत करुन विभागीय चौकशी करण्यात आली होती. चौकशी अंती त्यांच्यावर लावलेले आरोप सिध्द झाले. त्यामुळे आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी महाराष्ट्र महानगरपालिका कायदयाच्या कलम 56 अन्वये त्यांना सेवेतून बडतर्फ केले. बडतर्फीमुळे फुलझले यांना महापालिकेतून कुठल्याही सेवेचे आर्थिक लाभ मिळणार नाही. 

नागपूर : मालमत्ताधारकांकडून कर वसूल केला, मात्र महापालिकेच्या तिजोरीत भरणा न करता स्वतःच वापर करणाऱ्या कर संग्राहकाला आज मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बडतर्फ केले. आनंद फुलझले नावाच्या कर संग्राहकाने तीन वर्षात 93 लाख मालमत्ताधारकांकडून वसूल केले. या अपहाराप्रकरणी फुलझले यांना निलंबित करण्यात आले होते. 

लक्ष्मीनगर झोनचे कर संग्राहक आनंद फुलझले यांनी करदात्यांकडून 2014-15, 2015-16 आणि 2016-17 या तीन वर्षात 93 लाख रुपये वसूल केले. करदात्यांना त्यांनी पावतीही दिली. परंतु फुलझले यांनी ही रक्कम महानगरपालिकेच्या फंडात जमा करता स्वतःसाठी वापरले.

सर्व आर्थिक सुविधाही खंडीत 
एवढेच नव्हे त्यांनी पावत्याही रद्द केल्या. यापूर्वीही 2002 ते 2007 च्या दरम्यान सुध्दा 15 लक्ष रुपयाचा अपहार केला होता. त्यासाठी त्यांना निलंबीत करुन विभागीय चौकशी करण्यात आली होती. चौकशी अंती त्यांच्यावर लावलेले आरोप सिध्द झाले. त्यामुळे आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी महाराष्ट्र महानगरपालिका कायदयाच्या कलम 56 अन्वये त्यांना सेवेतून बडतर्फ केले. बडतर्फीमुळे फुलझले यांना महापालिकेतून कुठल्याही सेवेचे आर्थिक लाभ मिळणार नाही. 

Video : बघा, यवतमाळचा वाहतूक पोलिस किती हक्काने वसुली करतो... 

तीन वर्षे प्रशासन झोपेत 
फुलझले यांनी करदात्यांकडून 2014-15, 2015-16 आणि 2016-17 या तीन वर्षात 93 लाख रुपये वसूल केले. मात्र, यापैकी एकाही वर्षाचा कर त्यांनी भरला नाही. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. तीन वर्षांपर्यंत कर्मचारी कर वसुली करीत असून महापालिकेच्या तिजोरीत जमा करीत नाही, ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याही लक्षात आली नाही की जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करण्यात आली, अशी चर्चा आता रंगली आहे. 

निवडणुकीत मी पुन्हा येईन म्हणाल्यामुळे फडणवीस अडचणीत?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tukaram mundhe issued suspention order