तलावात उडी घेऊन दोन सख्ख्या भावांनी दिले थेट मृत्यूला निमंत्रण

file
file

कुही (जि.नागपूर): सकाळी झोपून उठताच त्यांनी जिल्ह्यातील एका तालुक्याच्या गावात जाऊन भंगार विकत घेण्याचा निश्‍चय केला. ठरल्याप्रमाणे सकाळी न्याहारी करून तिकडे निघाले. भंगार विकत घेऊन गावाकडे परत जात असताना त्यांना एक सुंदर तलाव दिसला. दुपारची वेळ आणि अंगाला झोंबणारे उन्ह...दोन्ही भावांना तलावात पोहण्याची इच्छा झाली आणि त्यांनी थेट तलावात उडी मारली; अन् जे व्हायला नको तेच झाले.  

तलावात अंघोळ करण्याचा घेतला निर्णय
कबाडी व्यवसाय करणाऱ्या दोघा भावांना रस्त्यात तलाव दिसल्यामुळे पोहण्याची इच्छा झाली व त्यांनी तलावात उडी घेतली. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघेही पाण्यात बुडाले व त्यांचा अंत झाला. ही घटना शनिवारी (ता.3) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.सनी शिवशंकर साहू(वय१९), वीरेंद्र शिवशंकर साहू(वय१६, काली माता मंदिर कळमना नागपूर) अशी मृत भावंडांची नावे आहेत.  सनी व वीरेद्र यांचा कबाडीचा व्यवसाय होता. ते व त्यांचा सहकारी रुपेश अजीयता हे तिघेही कबाडी साहित्य विकत घेण्याकरीता नागपूरवरुन त्यांच्या मालवाहक गाडीने आले. त्यांनी चापेगडी, देवळीकला, भिवकुंड या गावामधून कबाडी साहित्य घेतले. त्यानंतर ते साळव्याला यायला निघाले. त्याच मार्गावर फुटका तलाव दिसला. सध्या तापमान जास्त असल्यामुळे त्यांनी तलावात अंघोळ करण्याचा निर्णय घेतला. ते कपडे काढून पाण्यात शिरले. आधी लहान भाउ वीरेंद्र पाण्यात उतरला. मात्र पाण्याच्या पातळीचा अदांज  माहीत नसल्याने तो खोलगट भागात गेला. पोहायचा अनुभव नसल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला व ‘बचाव, बचाव’ म्हणून ओरडू लागला. हे बघून मोठा भाऊ धावला. तोही खोल पाण्यात गेला व बुडाला. हे सर्व बघून गाडीजवळ उभा असलेला रुपेश जाणाऱ्या येणाऱ्यांनी ‘वाचवा वाचवा’ म्हणून विनंती करु लागला. त्या दरम्यान देवळीकला येथील दोन नागरिकांनी पोलिस पाटील ममता उल्हास मेश्राम यांना माहीती दिली. घटनेची माहीती मिळताच कुहीचे नायब तहसीलदार उपेश अंबादे, सहाय्यक पोलिस निरीक्षक कमलेश  सोनटक्के ताफ्यासह घटनास्थळी हजर झाले. त्यांनी बचाव पथकाच्या मदतीने दोघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. शवविच्छेदनानंतर दोघांचेही मृतदेह आाई-वडीलांच्या ताब्यात देण्यात आले.

अधिक वाचाः ना फळं आले, ना बाग फुलली, योजना मध्येच रखडली, कारण आहे निधीचे
 

विहिरीत पोहणे जिवावर बेतले
जलालखेडा/ मोवाडः नरखेड तालुकांतर्गत वडेगाव (उमरी) शिवारातील उषा रेवतकर यांच्या शेतातील विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या मुलांपैकी त्या विहिरीत पोहणे एकाचे जिवावर बेतले. नेहमीच्या सवयीप्रमाणे शुक्रवारी दुपारी मित्रांसोबत दीपांशू संजय रेवतकर (वय१५, वडेगाव-उमरी) हा विहिरीत पोहण्यासाठी गेला. त्याने उंचावरुन विहिरीत उडी घेतली. दुर्दैवाने तो तळाशी गेला तर वर आलाच नाही.
एका राजकीय नेत्याने तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून रुग्णवाहिका पाठविण्याचे निर्देश दिले. त्यानुसार त्यांनी मोवाड प्राथमिक आरोग्य केंद्राची १०२ रुग्णवाहिका पाठविली असता ती रुग्णवाहिका दोन तास घटनास्थळी उभीच होती. परंतू दीपांशूचा मृतदेह सापडण्याचे नाव नव्हते. अखेर दीपांशूचा मृतदेह हाती लागल्यावर नरखेड ग्रामीण रुग्णालयातील शवविच्छेदन कक्षात मृतदेह पाठविण्यात आला.

संपादनःविजयकुमार राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com