वडील देवाघरी गेले... मात्र या देवदुतांच्या प्रयत्नांनी बचावले बहीण-भावाचे प्राण

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 25 April 2020

शहरात कोविड-19 रुग्ण संख्येने शतक गाठल्याने एकीकडे चिंता वाढली आहे. मात्र, त्याचवेळी कोरोनाचे 'हॉटस्पॉट' ठरलेल्या सतरंजीपुरा येथील मृत पावलेल्या कोरोनाबाधिताच्या संसर्गाने बाधित दोघे पूर्णपणे बरे झाल्याने कोरोना विरोधात लढा देणाऱ्या प्रत्येकाचे मनोबलही उंचावले आहे. 5 एप्रिलला सतरंजीपुरा बडी मशिद परिसरातील कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला. या रुग्णामुळे शहरातील 235 जणांना कोरोनाच्या संसर्गाचा धोका निर्माण झाला तर 56 कोरोनाबाधित ठरले. त्याच्या परिवारातील सर्व सदस्यांना मनपाच्या कोरोना कंट्रोल सेंटरमध्ये नेण्यात आले.

नागपूर : कोरोनाचा लागण झाल्यामुळे सतरंजीपुरा येथील एका व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाली. वय अधिक असल्याने आणि परिस्थिती हाताबाहेर गेल्याने अखेर त्यांचा मृत्यू झाला. मात्र मृत्यूपूर्वी त्यांच्या संपर्कात आल्याने कुटुबीयांसह अनेकांना संसर्ग झाला. त्या सर्वांवर डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार करण्यात येत आहेत. त्यापैकी मृत व्यक्तीचा मुलगा व मुलगी अखेर डॉक्टरांच्या अथक परिश्रमामुळे कोरोनापासून मुक्ती मिळाली. या दोन्ही बहीण-भावाला मेडिकलमधून सुटी देण्यात आली. मेडिकलमधील डॉक्‍टरांनी आनंद साजरा करीत त्यांना निरोप दिला.

शहरात कोविड-19 रुग्ण संख्येने शतक गाठल्याने एकीकडे चिंता वाढली आहे. मात्र, त्याचवेळी कोरोनाचे 'हॉटस्पॉट' ठरलेल्या सतरंजीपुरा येथील मृत पावलेल्या कोरोनाबाधिताच्या संसर्गाने बाधित दोघे पूर्णपणे बरे झाल्याने कोरोना विरोधात लढा देणाऱ्या प्रत्येकाचे मनोबलही उंचावले आहे. 5 एप्रिलला सतरंजीपुरा बडी मशिद परिसरातील कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला. या रुग्णामुळे शहरातील 235 जणांना कोरोनाच्या संसर्गाचा धोका निर्माण झाला तर 56 कोरोनाबाधित ठरले. त्याच्या परिवारातील सर्व सदस्यांना मनपाच्या कोरोना कंट्रोल सेंटरमध्ये नेण्यात आले. 7 एप्रिलला त्या मृतक कोरोनाबाधितांची 35 वर्षीय मुलगी व 30 वर्षीय मुलाचे 'स्वॅब' पॉझिटिव्ह आले होते.

14 दिवस घरीच विलगीकरणात राहणार 
तेव्हापासून दोघांवरही मेडीकलमध्ये उपचार सुरू होते. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांच्या मार्गदर्शनात तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या देखरेखीत त्यांच्यावर उपचार सुरू झाले. 14 दिवसांच्या 'हॉस्पिटल कॉरंटाईन'दरम्यान वेळोवेळी त्यांचे 'स्वॅब' घेण्यात आले. चौदाव्या दिवशी 21 एप्रिलला आणि पंधराव्या दिवशी 22 एप्रिलला घेण्यात आलेले दोघांचेही 'स्वॅब' निगेटिव्ह आले. त्यानंतर इतर आवश्‍यक सर्व तपासण्या करून आज दोघांनाही सुट्टी देण्यात आली.

मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तिपदी न्यायमूर्ती दत्ता 

रुग्णालयातून रुग्णांना सुट्टी देण्यात आली असली तरी त्यांना 14 दिवस 'होम क्वॉरंटाईन' राहणे बंधनकारक आहे. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांच्यासह डॉ. कांचन वानखेडे, डॉ. फैजल, डॉ. स्नेहल, डॉ. मुरारी सिंग, डॉ. श्‍याम राठोड, डॉ. चेतन वंजारी, डॉ. विपुल मोदीख, डॉ. पटनाईक, मालती डोंगरे, फार्मासिस्ट चक्रबर्ती यासर्वांसह उपस्थित परिचारिका व रुग्णालय कर्मचाऱ्यांनी त्यांचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two corona patients discharged from nagpur hospital