दिल्ली-मुंबईच्या वारांगना सापडल्या नागपूरात!

अनिल कांबळे
Monday, 5 October 2020

लॉकडाऊननंतर नागपुरात देहव्यापार मोठ्या धूमधडाक्यात सुरू होता. अनेक दलाल ऑनलाईन तर काही दलाल ब्युटी पार्लर, मसाज आणि स्पा सेंटर, नॅचरोपॅथी नावाने तर काही थेट मोठमोठे हॉटेल्स बूक करून देहव्यापार करीत होते.

नागपूर : उपराजधानीतील ऑनलाईन सेक्स रॅकेटवर सदर पोलिसांनी छापा घातला. या छाप्यात दिल्ली आणि मुंबईतील हायप्रोफाईल वारांगनांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच वेश्‍याव्यवसाय करवून घेणारा दलाल तुलसीदास उर्फ सागर देविप्रसाद हनवत (आग्याराम देवी मंदिराजवळ, गणेशपेठ) याला अटक केली. अजूनही एक दलाल फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊननंतर नागपुरात देहव्यापार मोठ्या धूमधडाक्यात सुरू होता. अनेक दलाल ऑनलाईन तर काही दलाल ब्युटी पार्लर, मसाज आणि स्पा सेंटर, नॅचरोपॅथी नावाने तर काही थेट मोठमोठे हॉटेल्स बूक करून देहव्यापार करीत होते.

काश्‍मीर, दिल्ली, पंजाब, चेन्नई, कर्नाटक, मध्यप्रदेश, आसाम, उत्तरप्रदेश आणि गुजरात राज्यासह मुंबईतील तरूणी देहव्यापारासाठी आणल्या जात होत्या. या सर्व प्रकाराकडे गुन्हे शाखेच्या एसएसबी शाखेचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष होते. त्यामुळे शहरातील हॉटेल्स, फार्महाऊस आणि हुक्का पार्लरमध्येही तरूणी वेश्‍याव्यवसाय करीत होत्या.

ऑनलाईन सेक्स रॅकेटसाठी दिल्लीहून २७ वर्षीय तर मुंबईतून २५ वर्षीय तरूणी नागपुरातील दलालाने बोलावल्याची माहिती सदरचे ठाणेदार महेश बनसोडे यांना मिळाली. त्यांनी अधिक माहिती काढली असता, दलाल दिपेश कानभर उर्फ गगन ठाकूर याने इंटरनेटवर ‘पीया कपूर’ नावाने वेबसाईट बनवून त्यावरून आंबटशौकिनांना तरूणी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली होती. तेथे तीन मोबाईल क्रमांक दिले होते. त्यावर कॉल करा आणि तरूणी बूक करा अशी ऑफर ठेवण्यात आली होती.

पॉश हॉटेलमध्ये मुक्काम
दिल्ली आणि मुंबईच्या दोन्ही तरूणी विमानाने थेट नागपुरात आल्या. त्यांना महागड्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आले. त्यांच्याशी १५ दिवसांचा करार सागर आणि गगन ठाकूरने केला होता. दोन्ही तरूणींना ८० हजार रूपये मिळणार होते. पोलिसांच्या पंटरने दोन तरूणींना बूक केले. सौदा ठरल्यानंतर साहर हनवत हा तरूणींना घेऊन सदरमधील दुवा कंटोमेंन्टल हॉटेलसमोर आला तर दुसऱ्या तरूणीला घेऊन रेल्वे स्टेशनजवळील वेदांता इन हॉटेलसमोर आला. पोलिसांनी तरूणींसह दलालाला अटक केली.

सविस्तर वाचा - फोरलेन ढाब्याच्या हुक्का पार्लरवर धाड; मालकासह चौघांना अटक

कंपनीच्या ट्रेनिंगला जाते
दिल्लीची तरूणी ही विवाहित असून तिने पतीला इंटरनॅशनल कंपनीत नोकरी करीत असल्याची माहिती दिली. कंपनीच्या कामासाठी १५ दिवस बाहेरगावी जात असल्याची थाप मारून वेश्‍याव्यवसाय करण्यासाठी ती नागपुरात आली. तर मुंबईची तरूणीसुद्धा विवाहित असून ईव्हेंट मॅनेजमेंटचे काम असल्याचे सांगून ती सेक्स रॅकेटमध्ये काम करीत होती, अशी माहिती आहे.

संपादन - स्वाती हुद्दार

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two girls arrested by police