esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

Two policemen suspended in Nagpur

आयुक्तांनी प्रकरणाची चौकशी केल्यानंतर प्रेमशंकर शुक्ला आणि अश्विन कुंभरे यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. डीसीपी डॉ. अक्षय शिंदे यांच्या चौकशीत दोन्ही कर्मचारी दोषी आढळले. काही ऑडिओ क्लीपमध्ये पोलिस पैशाचा मागणी करीत असल्याचे स्पष्ट झाले.

दोन पोलिस कर्मचारी निलंबित; वाळूचे ट्रक सोडण्यासाठी पैशांची मागणी करणे भोवले

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : हुडकेश्‍वर पोलिस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी वाळूचा ट्रक पकडल्यानंतर वाहतूकदाराला पैशाची मागणी केली. पैसे घेऊन ट्रक सोडून दिला. ही बाब पोलिस आयुक्तांपर्यंत पोहोचली. आयुक्तांनी दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांना थेट निलंबित करण्याचे आदेश दिले. आदेशानुसार पोलिस उपायुक्त डॉ. अक्षय शिंदे यांना पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केले. प्रेमशंकर शुक्ला आणि अश्विन कुंभरे असे निलंबित पोलिसांची नावे आहेत.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील अवैध वाळू तस्कर आणि गोवंशची वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. त्यानंतरही हुडकेश्‍वर पोलिस ठाण्यातील प्रेमशंकर शुक्ला आणि अश्विन कुंभरे या दोघांनी वाळू वाहतूकदारांकडून वसुली केती. पोलिस निरीक्षकांचे नाव सांगून दोघेही पैसे वसूल करीत होते.

अधिक माहितीसाठी - नितीन गडकरी म्हणाले, दोन महिन्यांत नागपूर विभाग डिझेलमुक्‍त करणार; इथेनॉलवर चालणार वाहने

सूत्रांच्या माहितीनुसार, दहा दिवसांपूर्वी प्रेमशंकर शुक्ला आणि त्याचा रायटर अश्विन कुंभरे यांनी विहीरगाव परिसरात वाळू वाहतूक करणारे ट्रक पकडले. ट्रक चालकांनी रॉयल्टी दाखवली. तरीही ट्रक सोडण्यासाठी ३० हजारांची मागणी केली. दोघांनीही १५ हजारांत सेटल करण्यावर तयारी दर्शविली. हुडकेश्वर पोलिस विनाकारण वाळू वाहतूकदारांकडून पैसे उकळत असल्यामुळे काहींनी लेखी तक्रार पोलिस आयुक्तांकडे केली.

आयुक्तांनी प्रकरणाची चौकशी केल्यानंतर प्रेमशंकर शुक्ला आणि अश्विन कुंभरे यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. डीसीपी डॉ. अक्षय शिंदे यांच्या चौकशीत दोन्ही कर्मचारी दोषी आढळले. काही ऑडिओ क्लीपमध्ये पोलिस पैशाचा मागणी करीत असल्याचे स्पष्ट झाले.

जाणून घ्या - आधार कार्ड काढताय? थांबा १५ दिवस!

शनिवारी दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांना पोलिस दलातून निलंबित करण्यात आले. पोलिस निरीक्षकांनीही ठाण्यात रोलकॉलवर सर्व कर्मचाऱ्यांना वसुलीबाजीपासून दूर राहण्याचे निर्देश दिले आहे. या कारवाईमुळे पोलिस दलात एकच खबळब उडाली आहे.

go to top