ख्रिसमस, नववर्षाच्या पर्वावर दोन स्पेशल ट्रेन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 डिसेंबर 2019

02112 / 02111 क्रमांकासह 22 डिसेंबर ते 13 जानेवारीदरम्यान नागपूर- सोलापूर-नागपूर ही गाडी एकूण चार फेऱ्या करणार आहे.

नागपूर : ख्रिसमस आणि नववर्षाच्या पार्श्‍वभूमीवर प्रवासी गाड्यांची प्रतीक्षायादी लांबत चालली आहे. ही बाब लक्षात घेऊन नागपूरहून सोलापूरसाठी दोन स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या दोन्ही गाड्या एकूण सात फेऱ्या करणार असून त्यामुळे नागपूरकर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

02112 / 02111 क्रमांकासह 22 डिसेंबर ते 13 जानेवारीदरम्यान नागपूर- सोलापूर-नागपूर ही गाडी एकूण चार फेऱ्या करणार आहे. 02112 नागपूर-सोलापूर ट्रेन 23 डिसेंबर ते 13 जानेवारीदरम्यान प्रत्येक सोमवारी दुपारी तीनला रवाना होईल आणि मंगळवारी सकाळी 8.40 वाजता सोलापूरला पोहोचेल. याचप्रमाणे 02111 सोलापूर-नागपूर स्पेशल ट्रेन 22 डिसेंबर ते 12 जानेवारीदरम्यान प्रत्येक रविवारी रात्री आठला सोलापूरहून रवाना होऊन सोमवारी दुपारी दीडला नागपूरला पोहोचेल.

असे का घडले? - प्रेमासाठी वाट्टेल ते, प्रियकराला वाचविण्यासाठी केले असे..
 

या गाडीला वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुरडुवाडी स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. 
दुसरी सुपरफास्ट स्पेशल ट्रेन 02114 / 02113 क्रमांकासह 26 डिसेंबर ते 10 जानेवारीदरम्यान नागपूर-सोलापूर-नागपूरदरम्यान एकूण तीन फेऱ्या करणार आहे. 02114 नागपूर-सोलापूर ट्रेन 27 डिसेंबर ते 10 जानेवारीदरम्यान प्रत्येक शुक्रवारी सायंकाळी 7.40 वाजता नागपूरहून रवाना होईल आणि शनिवारी दुपारी 1.30 वाजता सोलापूरला पोहचेल. 

02113 सोलापूर-नागपूर ट्रेन 26 डिसेंबर ते 9 जानेवारीदरम्यान प्रत्येक गुरुवारी दुपारी एकला सोलापूरहून निघेल आणि शुक्रवारी पहाटे 5.15 वाजता नागपूरला पोहोचेल. या गाडीला वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुरडुवाडी स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. दोन्ही गाड्यांना 10 स्लीपर आणि सहा जनरल डबे राहतील. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two special trains on Christmas, New Year's Eve