मोठी बातमी : उद्धव ठाकरेंचे महाआघाडी सरकार हिंदू विरोधी, कोणी केला हा आरोप, वाचा

राजेश प्रायकर
Friday, 7 August 2020

बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीरपणे बाबरी मशीद शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला अभियान आहे असे सांगितले होते. उद्धव ठाकरे यांच्या मनातही स्वागताची भावना असावी. मात्र, शरद पवार आणि सोनिया गांधी यांची एनओसी नसल्याने शिवसेनेने राम मंदिर उभारणीच्या स्वागतात कंजुसी केली असावी असा टोलाही आमदार कृष्णा खोपडे यांनी मारला.

नागपूर : अयोध्येत राम मंदिर उभारले जात असल्याने महाआघाडी सरकार चांगलेच नाराज झाले आहे. अयोध्येला जाणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राममंदिराच्या भूमिपजूनाचे स्वागत करणे अपेक्षित होते. मात्र, ठाकरे सरकारने पोलिसांच्या माध्यमातून ठिकठिकाणी श्री रामाचा जयघोष करणाऱ्या रामभक्तांवर कारवाई करून आपल्या हिंदूविरोधी मानसिकतेचा परिचय दिला. हे सरकार हिंदू विरोधी असल्याचा आरोप भाजपच्या एका मोठ्या नेत्याने केला आहे.

सत्तेसाठी शिवसेना हिंदूविरोधी तर झालीच, पण व्होट बँकेसाठी त्यांनी हिरवा झेंडा स्वीकारलेला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जय श्रीराम म्हणणाऱ्यांवर कारवाई होईल, असे आधीच जाहीर केले होते. वरिष्ठांच्या आदेशानुसार त्यांनी ती कारवाई केलीसुद्धा. काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांच्या वक्तव्यानंतर पालकमंत्री नितीन राऊत यांना रामाची आठवण आली आणि काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी हनुमान चालीसा पठन केला, असे आमदार कृष्णा खोपडे म्हणाले.

कसं काय बुवा? - घरच्या कर्ता पुरुषाचा मृत्यू झाल्याने नातेवाईक रडत होते ढसा ढसा, डॉक्टरांनी दिली रुग्ण जिवंत असल्याची बातमी, वाचा संपूर्ण प्रकार...

बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीरपणे बाबरी मशीद शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला अभिमान आहे असे सांगितले होते. उद्धव ठाकरे यांच्या मनातही स्वागताची भावना असावी. मात्र, शरद पवार आणि सोनिया गांधी यांची एनओसी नसल्याने शिवसेनेने राम मंदिर उभारणीच्या स्वागतात कंजुसी केली असावी असा टोलाही आमदार कृष्णा खोपडे यांनी मारला.

‘जय श्रीराम' म्हणण्यासाठी परवानगी लागेल काय?

सुमारे तीन दशकांपासून राम मंदिर निर्माणासाठी सुरू असलेल्या संघर्षाची स्वप्नपूर्ती होऊ लागली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते बुधवारी मंदिर उभारणीची पायाभरणी करण्यात आली. याचा आनंद साजरा करण्यासाठी शहरात ठिकठिकाणी भगवे झेंडे, पताका लावले जात होते. मात्र, पोलिसांनी रामभक्तांना अडविले. रामभक्तांवर पोलिसांनी कारवाई केली. हिंदूंना जय श्रीराम म्हणण्यासाठी पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल काय, असा सवाल भाजपचे शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांनी उपस्थित केला आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uddhav Thakare's grand alliance government is anti-Hindu