जंगलातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर प्राण्यांना जाण्यासाठी "अंडरपास' रस्ता

Underpass road for animals to cross the road
Underpass road for animals to cross the road

नागपूर :  राष्ट्रीय महामार्गांवरील अपघात आणि मनुष्य व प्राण्यांचे मृत्यू ही चिंतेची बाब आहे. हे अपघात आणि मृत्यू रोखून मानवाचे आणि प्राण्यांचे जीवन वाचविण्यासाठी राष्ट्रीय रस्ते व परिवहन मंत्रालय उपाययोजना करीत आहे. या उपाययोजनांमुळे सुमारे 30 टक्‍क्‍यांपर्यंत अपघातात आणि मानव व प्राण्यांच्या मृत्यूत घट झाली आहे. तमिळनाडू या राज्याने जागतिक बॅंकेच्या सहकार्याने अपघात आणि मृत्यू रोखण्यासाठी जी मोहीम राबविली, ती मोहीम देशातील सर्व राज्यांनी राबवली पाहिजे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

महामार्गावरील अपघात आणि मानव व प्राण्याचे मृत्यू रोखण्यासाठी आयोजित जनजागृती मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी गडकरी नागपुरात बोलत होते. व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून हा कार्यक्रम झाला. युनायटेड नेशन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या संयुक्त वतीने राष्ट्रीय महामार्गावरील अपघात आणि मानव व प्राण्यांचे मृत्यू रोखण्यासाठी एक राष्ट्रीय जनजागृती मोहीम राबविली जात आहे. दरवर्षी 5 लाख अपघात होतात, यात 1 लाख लोकांचा जीव जातो. मनुष्य आणि प्राण्यांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी उपाययोजना आखल्या जात आहेत, असे गडकरी म्हणाले.

प्राण्यांचे मृत्यू ही गंभीर बाब आहे. प्राण्यांचे जीव वाचवले जावे यासाठीच जंगलातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याखालून प्राण्यांना जाण्यासाठी रस्त्यांचे निर्माण केले जात आहे. नागपूर जबलपूर मार्गावर असे "अंडरपास' तयार करण्यात येत आहे. याकरिता वनविभागालाही आपली कार्यपद्धती बदलण्याची गरज आहे. वनविभागाच्या कार्यपद्धतीमुळे अनेक रस्त्यांचे प्रकल्प अडचणीत येतात, असेही गडकरी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com