ऑनलाइन शिक्षण देताना भेदभाव नको, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विद्यापीठांना सूचना

मंगेश गोमासे
Monday, 5 October 2020

सध्या कोरोनामुळे शाळा, महाविद्यालयात ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. मात्र, शिकविताना कुठलाही भेदभाव नको, अशा सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने महाविद्यालयांना दिल्या आहेत.

नागपूर : विद्यापीठ अनुदान आयोगाने ऑनलाइन शिक्षण घेताना विद्यार्थ्यांविरोधात कोणताही भेदभाव होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासह देशभरातील शैक्षणिक संस्थांना दिले आहेत. याशिवाय 'जेंडर चॅम्पियन मोहिम'चा अहवाल युजीसीकडे पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

हेही वाचा - सकाळ IMPACT : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची दयनीय अवस्था होणार दूर, ९ एक्स-रे तंत्रज्ञांची तत्काळ...

विद्यापीठ अनुदान आयोगाने शैक्षणिक संस्थांकडून लैंगिक भेदभाव दूर करण्यासाठी आणि समाजातील मुला-मुलींना समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी 'जेंडर चॅम्पियन मोहिम'नावाची मोहीम सुरू केली आहे. शालेय-महाविद्यालयांमध्ये नियमितपणे हजेरी लावा आणि वार्षिक कामगिरी ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असेल आणि नेतृत्व क्षमता असेल, अशा विद्यार्थ्यांना जेंडर चॅम्पियन म्हणून नियुक्त करायचे होते. मात्र, महाविद्यालयांकडून मोहिमेची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे. विद्यापीठाने अशा किती महाविद्यालयांवर कारवाई केली? याविषयीही माहिती पाठवायची आहे. 

हेही वाचा - जलतरण पटूंच्या आशा पल्लवित; मात्र, स्विमिंगमुळे विषाणूचा प्रसार होऊन इन्फेक्शन पसरण्याची अधिक भीती

या आहेत जबाबदाऱ्या - 
जेंडर चॅम्पियन त्यांच्या वर्गमित्रांना आणि इतर समवयस्कांना लैंगिक भेदभाव दूर करण्यासाठी मार्गदर्शन करतील. हे चॅम्पियन महाविद्यालयात विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्यात समानता स्थापित करण्याचा प्रयत्न करतील. महाविद्यालयातील मुले- मुली आणि शिक्षिकांना आदराने वागवण्याची खात्री देतील. याबरोबरच त्यांना पुढे येण्याच्या संधीही उपलब्ध करून देतील. त्यांच्यासाठी वेळोवेळी गट चर्चा, वादविवाद, पोस्टर स्पर्धा, चित्रपट महोत्सव आयोजित करतील. शाळा, महाविद्यालये, समाजातील विविध घटकही या मोहिमेशी संबंधित असतील. महाविद्यालयाच्या दैनंदिन कामात महिला विद्यार्थी किंवा महिलांमधील असमानता दूर करण्याचा प्रयत्न करतील. महिलांच्या मदतीसाठी हेल्पलाइन नंबर देऊन त्यांचे संरक्षण करतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: university grant commission informed to colleges to maintain equality while online education