esakal | हुंडा दिला नाही म्हणून तो पत्नीशी करायचा अनैसर्गिक कृत्य
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

सोन्याचे दागिने देण्यास पीडित महिला व तिच्या कुटुंबीयांनी असमर्थता दर्शविली. त्यामुळे डॉक्‍टरने पत्नीशीच अनैसर्गिक कृत्य करायला सुरुवात केली. अखेर त्याच्या त्रासाला कंटाळून महिलेने बेलतरोडी पोलिस ठाण्यात तक्रार केली.

हुंडा दिला नाही म्हणून तो पत्नीशी करायचा अनैसर्गिक कृत्य

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : हुंड्यात 25 तोळे सोने न दिल्याने डॉक्‍टरने 35 वर्षीय पत्नीशी अनैसर्गिक शारीरिक संबंध प्रस्थापित करीत अत्याचार केला. ही खळबळजनक घटना बेलतरोडी भागात उघडकीस आली. याप्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी डॉक्‍टरविरुद्ध अनैसर्गिक कृत्य व ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिलाही डॉक्‍टर असल्याची माहिती आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी डॉक्‍टर आणि पीडित डॉक्‍टर युवती सारख्या व्यवसायात असल्यामुळे 2008 मध्ये एकमेकांच्या संपर्कात आले. दोघांची ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. मैत्री झाल्यानंतर दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघेही डॉक्‍टर असल्यामुळे लग्न करण्याचा निर्णय घेतला. 

अधिक वाचा : मनोरंजन केंद्राच्या आड सुरू होते हे धंदे, पोलिस आले आणि...

2010 मध्ये डॉक्‍टरने पीडित महिलेशी लग्न केले. लग्नानंतर तो पत्नी व तिच्या आईवडिलांना 25 तोळे सोन्याचे मागणी करायला लागला. एवढे सोन्याचे दागिने देण्यास पीडित महिला व तिच्या कुटुंबीयांनी असमर्थता दर्शविली. त्यामुळे डॉक्‍टरने पत्नीशीच अनैसर्गिक कृत्य करायला सुरुवात केली. अखेर त्याच्या त्रासाला कंटाळून महिलेने बेलतरोडी पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. डॉक्‍टर फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.