esakal | परीक्षेच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांचे लसीकरण करा; आमदारांसह संघटनांची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

Vaccinate teachers on the background of the exam Demand for associations with MLAs

सध्या अनेक शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून येते. त्यामुळे परीक्षेतून सामूहिक संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शिक्षक संघटनांनीही त्याच्यासाठी सर्व वयातील शिक्षकांचे लसीकरण करावे अशी मागणी केली आहे. 

परीक्षेच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांचे लसीकरण करा; आमदारांसह संघटनांची मागणी

sakal_logo
By
मंगेश गोमासे

नागपूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दहावी, बारावी परीक्षांमध्ये संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण करावे, अशी मागणी शिक्षक आमदार नागोराव गाणार आणि शिक्षक संघटनांनी केली आहे.

१ ते २५ मार्चदरम्यान दहावीची परीक्षा घेण्यात येते. मात्र, कोरोनामुळे यावर्षी २३ एप्रिल ते २१ मेदरम्यान बारावी तर २९ एप्रिल ते २० मेदरम्यान दहावीचे पेपर घेण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रकोप लक्षात घेता, ज्या शाळेत विद्यार्थी शिकले, त्याच शाळेत व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहे.

महत्त्वाची बातमी - चोर पावलांनी कमी होतो शरीरातील ऑक्सिजन; पन्नाशी ओलांडलेल्या ७० टक्के कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची गरज

नागपूर विभागातील २ हजार ७१८ शाळांमधून दहावीसाठी १ लाख ५५ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. त्याच्या परीक्षांसाठी १ हजार ६९१ केंद्र तर १ हजार ७९३ उपकेंद्र तयार करण्यात आले आहे. याशिवाय बारावीच्या १ हजार ५२३ कनिष्ठ महाविद्यालयातून १ लाख ४६ हजार ९९१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यांच्या परीक्षांसाठी ४७४ केंद्र आणि ९३८ उपकेंद्र तयार करण्यात आले आहे.

मात्र, परीक्षेदरम्यान कुठलाही गोंधळ होऊ नये यासाठी विभागीय शिक्षण मंडळाला विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. त्यातूनच प्रत्येक केंद्रावर बाहेरच्या शिक्षकांना नेमण्यात येणार असल्याचे दिसून येते. सध्या अनेक शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून येते. त्यामुळे परीक्षेतून सामूहिक संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शिक्षक संघटनांनीही त्याच्यासाठी सर्व वयातील शिक्षकांचे लसीकरण करावे अशी मागणी केली आहे. 

परीक्षा थांबविता येणार नाही
कोरोनामुळे परीक्षा थांबविता येणार नाही. राज्य सरकारने खबरदारी म्हणून सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लसीकरणास सुरवात करावी. 
- प्रा. राजेंद्र झाडे,
राज्य उपाध्यक्ष, शिक्षक भारती

अधिक माहितीसाठी - रणजित सफेलकरची पोलिसांनी काढली धिंड; अनवाणी पायाने, बरमुड्यावरच नेले न्यायालयात

परीक्षार्थी 

  • दहावी - १,५५,५१० 
  • बारावी - १,४६,९९१ 
वर्ग एकूण शाळा परीक्षा केंद्र उपकेंद्र १४ पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा
बारावी १५२३ ४७४ ९३८ ९४
दहावी २७१८ ६९१ १७९३ २२४