esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

vaccination center closed due to lack of vaccine stock in nagpur

केंद्र शासनाकडून राज्य शासनाला कोरोना नियंत्रणासाठी कोव्हॅक्सिन लस अल्प प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे नागपुरातील पाच केंद्रावर लावण्यात येणारी कोव्हॅक्सिन लस संपली. विशेष असे की, मेडिकलमधील लसीकरण केंद्रावर दुसरा डोस देणेही बंद झाले.

लसीकरण केंद्राला कुलूप; कोव्हॅक्सिनचा साठा संपला, तर कोविशिल्ड शनिवारपर्यंतच उपलब्ध

sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर : मुंबई आणि पुण्यानंतर राज्यात सर्वात जास्त रूग्ण नागपुरात आढळत आहेत. त्यामुळे उपराजधानीसीठी मोठ्या प्रमाणात लसीकरण होणे गरजेचे आहे. त्यासाठी लसींचा मुबलक साठा आवश्यक असताना केंद्र सरकारच्या भेदभावपूर्ण धोरणामुळे लसींचा साठा संपत आला आहे. मेडिकलमधील 'कोव्हॅक्सिन' लसींचे डोस संपले आहेत, तर कोविशिल्ड साठा केवळ शनिवारपर्यंतच पुरेल इतका आहे. त्यामुळे 'कोव्हॅक्सिन'चा दुसरा डोस घेण्यासाठी आलेले शेकडो रुग्ण परत गेले आहेत. मृत्यूसंख्या वाढत असल्याने लसींचा साठा संपणे अतिशय गंभीर आणि धोकादायक आहे. 

हेही वाचा - 'ते' ७५ जण सेवा द्यायला आले अन् घरी परतलेच नाहीत, रुग्णालयातच घेतला अखेरचा...

केंद्र शासनाकडून राज्य शासनाला कोरोना नियंत्रणासाठी कोव्हॅक्सिन लस अल्प प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे नागपुरातील पाच केंद्रावर लावण्यात येणारी कोव्हॅक्सिन लस संपली. विशेष असे की, मेडिकलमधील लसीकरण केंद्रावर दुसरा डोस देणेही बंद झाले. यामुळे टाळे लावण्याची वेळ या केंद्रावर आली. दुपारी ३ वाजता मेडिकलमधील लसीकरण केंद्रात कर्तव्यावरील डॉक्टर, परिचारिकांसह सारेच कर्मचारी निघून गेले. यामुळे मेडिकल केंद्रांवरून पहिल्या आणि दुसरा डोस घेणारे सुमारे ७८६ जण परत गेले असल्याची माहिती मिळाली. 

हेही वाचा - 'वक्त्यांची फॅक्टरी' कोमात, डिजिटल जोमात

१६ जानेवारी २०२१ रोजी लसीकरण सुरू झाले. तेव्हापासून तर आतापर्यंत १ लाख ७५ हजार १६० कोव्हॅक्सिन लसी नागपूर विभागाला प्राप्त झाल्या. पूर्वी नागपूरच्या मेडिकलमध्ये कोव्हॅक्सिन लस देण्यात येत होती. परंतु, पुढे पाच केंद्रावर ही लस सुरू करण्यात आली. नागपूर शहर आणि ग्रामीण भागात एक किंवा दोन दिवस पुरेल इतकाच कोविशिल्डचा साठा उपलब्ध आहे. 

साहब मेरे रोजे है - 
सोमवार से मेरे रोजे शुरू हो रहे है, मुझे और मेरे बिबिको व्हॅक्सिन दो..अशी विनवणी आज मेडिकलच्या लसीकरण केंद्रावर आलेला एक मुस्लिम व्यक्ती करीत होता. परंतु, लसीचा डोस नसल्याने ते आल्यापावली परत गेले. शुक्रवार किंवा शनिवारी कोव्हॅक्सिनची लस नागपुरात उपलब्ध झाल्यास घेता येईल. अन्यथा महिनाभरानंतर लस घ्यावी लागेल, असे ते म्हणाले. 


 

go to top