मेयोत मोठा अनर्थ टळला; अतिदक्षता विभागातील व्हेंटिलेटर बंद, नातेवाइक संतप्त

ventilator suddenly closed in indira gandhi government medical college nagpur
ventilator suddenly closed in indira gandhi government medical college nagpur
Updated on: 

नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) कोविड हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागाच्या (वॉर्ड क्रमांक ३३) मध्ये रविवारी साडेअकराच्या सुमारास अचानक व्हेंटिलेटरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. एका लाईनवरील सात ते आठ व्हेंटिलेटर बंद पडले. बंद पडताना झालेल्या स्पार्किंगच्या आवाजाने एकच खळबळ उडाली. आग तर लागली नाही ना अशी भीती निर्माण झाल्याने नातेवाइकांनी रुग्णालयासमोर गर्दी केली होती. 

मेयोच्या कोविड रुग्णालयात ६०० खाटा आहेत. यापैकी ४२५ खाटांवर कोरोनाबाधित रुग्ण आहेत. सर्वाधिक कोरोनाबाधित असलेल्या रुग्णालयात घटना घडलेल्या अतिदक्षता विभागात सुमारे ३० बाधित दाखल होते. अचानक व्हेंटिलेटरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि व्हेंटिलेटर बंद पडले. यामुळे मधल्या रांगेतील कोरोनाचे १० ते १२ बाधितांना अचानक त्रास जाणवू लागला. मात्र, समय सुचकतेमुळे तत्काळ या सर्व बाधितांना बाजूला असलेल्या रिकाम्या खाटांवर हलवण्यात आले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे रुग्णालयात भितीचे वातावरण पसरले होते. 

मेयोत रुग्णालयाचे आधुनिकीकरण करताना सर्जिकल कॉम्प्लेक्स तयार करण्यात आले. या कॉम्प्लेक्सचे फायर ऑडिट प्रमाणपत्र अद्याप आले नाही. मात्र या घटनेशी आगीचा संबंध नसल्याचे सांगण्यात आले. अनुचित घटना घडल्यानंतर संकटकालीन मार्ग येथे आहे. हायड्रन्ट व्यवस्थेसह स्मोक डिटेक्टर, फायर अलार्म अग्निशामक उपकरणांची सोय येथे आहे, असे खुद्द अधिष्ठाता डॉ. अजय केवलीया यांनी सांगितले. अग्निशमन विभागाचे शुल्क भरण्यात आले की, नाही हे मात्र कळू शकले नाही. 

वीज यंत्रणा तत्काळ बंद केली - 

अतिदक्षता विभागात एका व्हेंटिलेटरमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाला. पाच ते सहा व्हेंटिलेटरचा वीज पुरवठा बंद झाला. ही माहिती वीज अधिकाऱ्यांना दिल्यानंतर धावाधाव झाली. रुग्णांच्या खाटांना इतरत्र सरकवण्यात आले. तत्काळ दुसऱ्या खाटांवर हलवलेल्या रुग्णांना व्हेंटिलेटर लावण्यात आले. काही रुग्णांचे व्हेंटिलेटर बंद वीज यंत्रणेतून काढत इतर खाटांवर हलवून पुन्हा व्हेंटिलेटर लावले गेले. हा प्रकार बघून वार्डातील इतर रुग्ण घाबरले. त्यांनी नातेवाइकांना मोबाईलवरून हा प्रकार सांगितला. यामुळे नातेवाईक संतप्त झाले. अधिष्ठातांसह काही अधिकाऱ्यांनी नातेवाइकांची समजूत काढली. यानंतर प्रकरण निवळले. 

व्हेंटिलेटरवर वीज यंत्रणेचा वीजेचा भार वाढून त्यात तांत्रिक बिघाड झाला. त्वरित वीज पुरवठा बंद केला. सर्व व्हेंटिलेटर सुस्थितीत आहेत. आग लागलेली नाही. मात्र डॉक्टर, तंत्रज्ञ तसेच परिचारिकांनी दाखवलेल्या समयसुचकतेमुळे तत्काळ रुग्ण इतरत्र हलवले. 
-डॉ. अजय केवलीया, अधिष्ठाता, मेयो रुग्णालय, 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com