बहुजन विकासमंत्री म्हणतात, यापूर्वीचं सरकार महाहेराफेरी-1

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जून 2020

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज वाळू तस्करीच्या संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित केली होती. या बैठकीनंतर वडेट्टीवार पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, या सरकारमध्ये आम्ही नाराज असल्याच्या बातम्या पसरविल्या जात आहेत. पण आम्ही अजिबात नाराज नाही. या सरकारमध्ये चर्चेत आणि निर्णय प्रक्रियेत आम्हाला सहभागी करून घ्यावे, एवढीच आमची अपेक्षा आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झालेली आहे. आज बैठक होणार होती. पण, ती लांबणीवर पडली आणि उद्या होणार आहे. त्यामध्ये या विषयावर सविस्तर चर्चा होऊन मार्ग निघेल.

नागपूर : महाविकास आघाडीचे सरकार हेराफेरी-2 सरकार आहे, अशी टीका आशिष शेलारांनी केली होती. त्यावर हे सरकार जर हेराफेरी-2 असेल तर मग हेराफेरी-1 कोण? यापूर्वीचं सरकार महाहेराफेरी-1 होतं. आशिष शेलारांनी त्यांच्या वक्तव्यातून ही गोष्ट कबूल केली आहे. आम्हाला जर ते चोर म्हणताहेत तर ते महाचोर होते, असेच त्यांनी सुचविले आहे, असे राज्याचे बहुजन विकास मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज वाळू तस्करीच्या संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित केली होती. या बैठकीनंतर वडेट्टीवार पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, या सरकारमध्ये आम्ही नाराज असल्याच्या बातम्या पसरविल्या जात आहेत. पण आम्ही अजिबात नाराज नाही. या सरकारमध्ये चर्चेत आणि निर्णय प्रक्रियेत आम्हाला सहभागी करून घ्यावे, एवढीच आमची अपेक्षा आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झालेली आहे. आज बैठक होणार होती. पण, ती लांबणीवर पडली आणि उद्या होणार आहे. त्यामध्ये या विषयावर सविस्तर चर्चा होऊन मार्ग निघेल.

अवश्य वाचा- आर्थिक अडचणीतून सलून व्यावसायिकाने घेतला हा टोकाचा निर्णय...

समान वाटप व्हावे

विधान परिषद असो, शासकीय पदे वाटपाचा की महामंडळांचा विषय, यात समान वाटप व्हावे, ही कॉंग्रेसची मागणी आहे. त्यादृष्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करावी, असाच आमचा सूर आहे. बाकी आमच्यामध्ये काहीही अडचण नाही. सर्व ऑलवेल आहे. तिन्ही पक्ष मिळून भक्कमपणे सरकार चालवत आहोत. भविष्यातील विकासकामांच्या दृष्टीने आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत. विधान परिषद आणि महामंडळं यांचे वाटप समान होईल, त्यामुळे अडचण येणार नसल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vijay Vadettiwar says, the previous government Mahaherapheri-1