व्हीएनआयटीचा रिक्त पदांचा वनवास संपेना

file photo
file photo

नागपूर : देशातील नामांकित अभियांत्रिकी संस्थांपैकी एक असलेल्या विश्‍वेश्‍वरैय्या राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थेला (व्हीएनआयटी) रिक्त पदांचे ग्रहण कायम आहे. संस्थेच्या मान्यताप्राप्त असलेल्या ७०४ जागांपैकी जवळपास ४३ टक्के म्हणजे २९९ जागा रिक्त असल्याची माहिती आहे.

व्हीएनआयटीमध्ये बी.टेक आणि बी.आर्चमधील नऊ अभ्यासक्रम, १८ एम.टेक, तीन एम.एसस्सी. यासह पी.एचडी. अभ्यासक्रमांचा समावेश आहे. यात ३ हजार ७०० विद्यार्थी आणि ४०० स्कॉलर्स शिकतात. प्रोफेसर, असोसिएट्‌स आणि असिस्टंट प्रोफेसरच्या ३३५ जागांपैकी २३९ जागा भरण्यात आलेल्या आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी विचारलेल्या माहितीत ९६ जागा रिक्त असल्याचे समोर आले. त्या जागांचा अतिरिक्‍त भार विभागातील इतर प्राध्यापकांवर देण्यात आलेला आहे.

३३ अधिकाऱ्यांपैकी १९ जागा भरण्यात आल्या आहेत. तांत्रिक जागांचा विचार केल्यास १०१ वरिष्ठ तर १०० कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या जागांवर ३३ आणि ३६ इतकीच पदे भरण्यात आल्याचे दिसते. अशीच परिस्थिती त्या खालील पदांचीही आहे. कुलसचिवासह प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांचे पद प्रभारींच्या भरवशावर असून प्रोफेसर, असोसिएट, असिस्टंट प्रोफेसरसह तांत्रिक साहाय्यकासह अनेक पदांचा यात समावेश आहे. या प्रकाराने इतर अधिकारी आणि प्राध्यापकांवर अतिरिक्त कामाची जबाबदारी वाढल्याचे माहिती अधिकारात समोर आले आहे. लवकरच ती पदे भरण्यात येतील असा विश्‍वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांया रिच्क्त जागांची संख्या वाढली
२०१९-२० मध्ये प्रथम वर्षाच्या प्रवेशात एकूण १ हजार ४८३ जागांपैकी १ हजार ३५५ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्यामुळे १२८ जागा रिक्‍त राहिल्या आहेत. अनेक नव्या इमारती तयार करण्यात आलेल्या आहेत. परिसरात एकूण इमारतीची संख्या १४५ झालेली आहे.

रॅंकींग सुधारले
राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानाद्वारे देण्यात येणारे गतवर्षीच्या रॅंकींगच्या तुलनेत व्हीएनआयटीचे रॅंकींग यावर्षी सुधारले. ३१ व्या क्रमांकावरून २७ व्या क्रमांकावर झेप घेतली. यावर्षी संस्थेत १३० कंपन्यांनी भेट देऊन ५२१ विद्यार्थ्यांपैकी ४४९ विद्यार्थ्यांना प्लेसमेंट दिली. त्याचे प्रमाण ८६ टक्के आहे. यात एका विद्यार्थ्याला ३८.२१ लाखाचे वार्षिक पॅकेज देण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com