
दर आठवड्याला होणारे किडनीप्रत्यारोपणासह महिन्यात किमान दोनवेळा होणारे यकृत प्रत्यारोपणाला तीन महिन्यांपासून थांबा लागला आहे. उपराजधानीत 2 किडनीदानासह एक यकृत दानातून 6 जणांचा जीव फेब्रुवारीत वाचविण्यात आला होता. मा,म्मिार्चपासून अवयवदानासह अवयवप्रत्यारोपणाच्या सर्व शस्त्रक्रियांना लॉकडाउन करण्यात आले.
नागपूर : संसर्ग झालेल्यांसह कोरोनाशी लढणाऱ्या योद्ध्यांचे बळीही कोरोनाने घेतले आहेत. आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर आली. विशेष असे की, ज्यांना अवयवदानातून बोनस म्हणून आयुष्य जगण्याची संधी मिळणार आहे, अशा मृत्यूच्या दारात उभे असलेल्यांचे जगणेही लॉकडाउनमुळे प्रतीक्षायादीत आले आहे.
दर आठवड्याला होणारे किडनीप्रत्यारोपणासह महिन्यात किमान दोनवेळा होणारे यकृत प्रत्यारोपणाला तीन महिन्यांपासून थांबा लागला आहे. उपराजधानीत 2 किडनीदानासह एक यकृत दानातून 6 जणांचा जीव फेब्रुवारीत वाचविण्यात आला होता. मा,म्मिार्चपासून अवयवदानासह अवयवप्रत्यारोपणाच्या सर्व शस्त्रक्रियांना लॉकडाउन करण्यात आले.
राज्यात अवयवदानाची तुलना करताना मुंबई, पुणेनंतर नागपुरातच अवयवदानाची मोहीम गतीने सुरू आहे. मात्र, महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण 9 मार्च रोजी आढळून आल्यानंतर क्वचित मुंबई अथवा पुण्यात जिवंत माणसाकडून एखादे किडनीदानाची शस्त्रक्रिया झाली असावी अशी शक्यता आहे. मात्र, कोरोनाच्या लॉकडाउनमुळे नागपुरातील ब्रेनडेडपासून तर नातेवाइकांकडून होणाऱ्या किडनीग्रस्तासांठीचेही किडनी दान थांबले आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांना वेगळीच धास्ती....वाचा काय आहे कारण -
2019 मध्ये मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यात एकूण किडनी, यकृतासह त्वचा व इतरही 15 ते 17 अवयवदानाच्या व अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या होत्या. मात्र, 2020 मध्ये मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यांत एकाही नातेवाइकांकडूनही किडनीदान करण्यात आले नाही. 2020 सालच्या जानेवारी महिन्यात मेंदूपेशी मृत झालेल्यांकडून 14 किडनी तर 8 यकृत आणि 1 हृदय उपलब्ध झाले. फेब्रुवारीत 19 किडनी तर 7 यकृत दानाच्या शस्त्रक्रिया झाल्या. मार्चमध्येही पुणे, मुंबईत किडनीसह यकृत दानाच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. मात्र, मार्चच्या अखेरीस लॉकडाउनची घोषणा झाली आणि मेंदूपेशी मृत्यू पावलेल्यांपासून तर नातेवाइकांकडून होणारे किडनीदानही थांबले.
ब्रेनडेड घोषितच झाले नाहीत
कोरोनामुळे लॉकडाउन लागू करण्यात आल्यानंतर नागपुरात एकही मेंदूपेशी (ब्रेनडेड) मृत झालेल्यांची माहिती मिळाली नाही. विशेष असे की, मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांत नागपुरात एकही अवयव प्रत्यारोपण झाले नाही. या कालावधीत कोणत्याही खासगी रुग्णालयात ब्रेनडेड रुग्ण आढळून आला नाही. आपल्या माणसाकडून अयवयांच्या प्रतीक्षेतील व्यक्तीलाही या लॉकडाउनमुळे मरण यातना भोगत दिवस मोजावे लागत आहे.
अवयव प्रत्यारोपण
-महिना 2020 -मूत्रपिंड -यकृत
-जानेवारी - -14 - 8
-फेब्रुवारी - -19 - 7
सध्याची कोरोनाजन्य स्थिती बघता, या काळात अवयव प्रत्यारोपण करताना संसर्गाची जोखीम वाढते. शस्त्रक्रियेदरम्यान रोगप्रतिकारशक्ती कमी होते. विभागीय अवयवदान समितीच्या अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी आणि सचिव डॉ. रवी वानखेडे यांच्या मार्गदर्शनात अवयवदान मोहिमला नागपूर विभागात गती मिळाली आहे. काही दिवस हा थांबा आहे. नागपुरात अवयवदानाची चळवळ रुजलेली असून ती अधिक गतिशील करण्यासाठी प्रयत्न करू.
-डॉ. आनंद संचेती, प्रसिद्ध हृदय प्रत्यारोपणतज्ज्ञ, नागपूर