बेसा पॉवर हाऊस परिसरात फिरत होता रमजान, पोलिसांना समजताच...

बुधवार, 10 जून 2020

रमजान तडीपार असताना परवानगीशिवाय बेसा पॉवर हाऊस परिसरात फिरत आहे. तत्काळ पोलिसांचे पथक तेथे पोहोचले आणि त्याला अटक केली. त्याच्यावर कलम 142 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.

20 गुन्ह्यांतील वॉंटेडला अटक

नागपूर : गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी एका तडीपार गुंडाला परिसरात फिरताना अटक केली. अटकेतील आरोपी म्हाळगीनगर, बेसा पॉवर हाऊस झोपडपट्टी निवासी शेख रमजान शेख नजीर कुरेशी ( वय 26) आहे. रमजान हिस्ट्रीशीटर आहे. त्याच्यावर शहरातील वेगवेगळ्या ठाण्यांमध्ये 19 गुन्हे नोंद आहेत.

त्याचा गुन्हेगारी तपशील पाहता 18 सप्टेंबर 2019 ला झोन 4 च्या डीसीपी निर्मलादेवी यांनी त्याला 2 वर्षांसाठी शहरातून तडीपार केले होते. पोलिस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांनी ऑपरेशन क्रॅकडाऊन अंतर्गत सर्व गुन्हेगारांची तपासणी करण्याचे आदेश विभागाला दिले आहेत. शहरभरात गुन्हेगारांची धरपकड आणि कारवाई सुरू आहे.

"त्या' व्हिडिओप्रकरणी जाणून घ्या उपराजधानीतील धक्‍कादायक वास्तव...

मंगळवारी पोलिसांना माहिती मिळाली की, रमजान तडीपार असताना परवानगीशिवाय बेसा पॉवर हाऊस परिसरात फिरत आहे. तत्काळ पोलिसांचे पथक तेथे पोहोचले आणि त्याला अटक केली. त्याच्यावर कलम 142 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई डीआयजी नीलेश भरणे, डीसीपी गजानन राजमाने आणि एसीपी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनात पोनि अशोक मेश्राम, सपोनि दिलीप चंदन, पोहवा कृपाशंकर शुक्‍ला, प्रशांत कोडापे, बबन राऊत, नितीन अकोते आणि श्रीकांत मारवाडे यांनी केली.

शस्त्रासह मिथुन अटकेत

सदर ठाण्यांतर्गत पोलिसांनी मंगळवारी एका गुंडाला शस्त्रासह अटक केली. मिथुन दिनो गिरीगोसावी (19 गड्डीगोदाम, परदेशीपुरा, सदर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सदर ठाण्याचे पोहवा विनोद तिवारी ऑपरेशन क्रॅक डाऊन मोहिमेंतर्गत हिस्ट्रीशीटर आरोपींच्या शोधात गस्तीवर होते. दरम्यान त्यांना गुप्त माहिती मिळाली, आरोपी मिथुन गड्डीगोदाम रेल्वे अंडरपासजवळ धारदार शस्त्रासह एखादा मोठा गुन्हा करण्याच्या तयारीत फिरत आहे. तिवारी सहकाऱ्यांसह तत्काळ ते पोहोचले. पोलिसांना पाहताच आरोपीने पळ काढला, मात्र पाठलाग करून त्याला पकडण्यात आले. झडतीमध्ये त्याच्याजवळ हत्तीमार चाकू सापडला. आरोपीवर गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wanted Criminal arrested by Crime Branch