जनजागरणासाठी कोविडयोद्धे बनून हे समाजसेवक झटताहेत पोलिसांसमवेत

We are fighting against corona
We are fighting against corona
Updated on

नागपूर : दिवसेंदिवस उग्र रूप धारण करीत असलेल्या कोरोनाविरोधात अख्खा देश एकजूट झाला असून, समाजाच्या सर्वच स्तरातील लोक या महायुद्धात आपापल्या परीने योगदान देत आहेत. झिंगाबाई टाकळी परिसरातील समाजसेवकही यात मागे नाहीत. येथील जवळपास डझनभर समाजसेवक 'कोविड योध्दा' बनून कोरोनाविरुद्धची लढाई लढत आहेत. मानकापूर पोलिसांच्या मदतीने आयोजित या उपक्रमाची सर्वत्र स्तुती होत आहे.         

कोरोनाला हरविण्यासाठी डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, स्वच्छता कर्मचाऱ्यांसह पोलिस विभाग रात्रंदिवस घाम गाळत आहेत. त्याउपरही कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक वाढतच आहेत. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे. झिंगाबाई टाकळी परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी मानकापूर पोलिसांनी येथील सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. ठाण्याचे प्रमुख गणेश ठाकरे यांनी संजय भिलकर व त्यांचे सहकारी नागेश राऊत, कृष्णा गावंडे, जगदिश गमे, विजय गायधने, अजय इंगोले,  राजेन्द्र बढिये, अरुण भोयर, निखिल कापसे व शुभम चौधरी यांची 'कोविड योद्धा' म्हणून नियुक्ती केली आहे. या सर्वांना पोलिसांतर्फे कोविड कॅप व शिटी देण्यात आली असून, पोलिसांच्या मदतीने ते सध्या टाकळी परिसरात जनजागृती करीत आहेत. यात प्रामुख्याने परिसरातील घरे सॅनिटाईझ करणे, नागरिकांना  'लाॅकडाऊन'चे पालन करण्याचे आवाहन करणे आणि  'सोशल डिस्टंन्सिग'चे महत्त्व पटवून देणे, या बाबींचा समावेश आहे. पोलिसांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, कोरोनाच्या संकटकाळात समाजसेवा करण्याची संधी मिळत असल्याबद्दल कार्यकर्तेही खूष आहेत.
 

आमचेही योगदान    कोरोनाचे संकट भयंकर असून, याविरोधात लढण्यासाठी सर्वांना एकजूट होण्याची आज खऱ्या अर्थाने गरज आहे. या लढाईत आमचेही थोडेफार योगदान आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आम्ही सर्व जण दिवसरात्र मेहनत घेऊन, कोरोनाला नागपुरातून हद्दपार करून दाखवू.'  

- संजय भिलकर, 'कोविड योद्धा'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com