व्यापाऱ्यांवर आता कोणते संकट येणार ?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जून 2020

गेल्या दोन दिवसांत दीडशेच्या जवळपास रुग्ण आढळून आले. त्यामुळे प्रशासनात धावपळ माजली आहे. यातूनच पुन्हा कठोर लॉकडाउन सुरू करण्याची चर्चा दोन दिवसांपासून सुरू झाली. शहराचा कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असतानाच दुकानदार, व्यावसायिकांच्याही काळजाचे ठोके वाढले आहे. जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने आधीपासून सुरू आहे. मात्र, इतर दुकानदार, व्यावसायिकांना 5 जूनपासून दुकाने सुरू करण्याची परवानगी देण्यात आली.

नागपूर : शहरात दररोज कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून संपूर्ण राज्याचेही चित्र यापेक्षा वेगळे नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनाही कठोर लॉकडाउनची चाहूल लागली असून त्यांनी नुकताच झालेल्या गुप्त बैठकीत व्यवसायावरील धोक्‍याबाबत चर्चा केली. कठोर लॉकडाउन लागल्यास आता कुठे सुरू झालेली दुकाने पुन्हा बंद होईल, या भीतीने व्यापाऱ्यांची झोप उडाली आहे. 

 

अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणण्यासाठी राज्य सरकारने "मिशन बिगीन अगेन'अंतर्गत टप्प्याटप्प्याने उद्याने, दुकाने आणि खासगी कार्यालये सुरू केली. मात्र, त्याचवेळी लॉकडाउन 30 जूनपर्यंत असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले. परंतु, दुकाने उघडताच नागरिकांची गर्दी ओसंडून वाहत आहे. परिणामी शहरात कोरोनाबाधितांची दररोजचा आकडा वाढत असून आजही 57 रुग्ण आढळून आले.

 

गेल्या दोन दिवसांत दीडशेच्या जवळपास रुग्ण आढळून आले. त्यामुळे प्रशासनात धावपळ माजली आहे. यातूनच पुन्हा कठोर लॉकडाउन सुरू करण्याची चर्चा दोन दिवसांपासून सुरू झाली. शहराचा कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असतानाच दुकानदार, व्यावसायिकांच्याही काळजाचे ठोके वाढले आहे. जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने आधीपासून सुरू आहे. मात्र, इतर दुकानदार, व्यावसायिकांना 5 जूनपासून दुकाने सुरू करण्याची परवानगी देण्यात आली.

 

अनेक दुकानदारांनी 72 दिवसांनंतर दुकाने उघडली. तत्पूर्वी अनेक दुकानदारांनी, विशेषतः कपड्यांच्या व्यावसायिकांनी दुकानांचे नूतनीकरण केले. दुकाने सुरू होऊन आठवडाही पूर्ण झाला नाही, तोच आता कोरोनाबाधितांच्या दररोज वाढत्या संख्येने पुन्हा व्यवसायावर लॉकडाउनच्या संकटाचे ढग आणखी गडद होताना दिसत आहे. लॉकडाउनमध्ये नियमाने वागण्याचा सल्ला दिल्यानंतरही नागरिकांनी मनमानी सुरू केल्याने पुन्हा कठोर लॉकडाउन होण्याची शक्‍यता आता व्यक्त केली जात आहे.

नागपुरातील शैक्षणिक संस्थाचे रॅंकिंग जाणून घ्यायचे आहे...वाचा

गेली अडीच महिने संयम दाखविणारे नागरिकच आता कठोर लॉकडाउनची स्थिती ओढवून घेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सुरू झालेला व्यवसाय पुन्हा काही दिवस, महिने बंद पडण्याच्या भीतीने व्यापाऱ्यांच्या मनात घर केले आहे. त्यामुळेच संभाव्य लॉकडाउनच्या धोक्‍यावर तोडगा काढण्यासाठी व्यापाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी गुप्त बैठक घेतली. पुन्हा व्यवसाय बंद होण्याच्या स्थितीत काय करावे, काय नाही, यावर चर्चा केली. 

 

नियमाबाबत ग्राहकांना देणार उपदेश 
दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी कमी करण्यासाठी पावले उचलण्याची गरज काही व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. दुकानांमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांना लॉकडाउनच्या काळातील नियमांचे पालन करावे, असे उपदेश देण्यात यावे, अशीही सूचना काहींनी व्यक्त केली. दुकानांमध्ये एका वेळी एकच ग्राहकाला विक्री करणे, ज्याच्यासाठी कपडे घ्यायचे आहे, त्यालाच दुकानात प्रवेश देणे, अशा सूचनाही पुढे आल्या आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What crisis will befall the traders now?