अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत काय म्हणाले माजी कुलगुरू. वाचा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 जून 2020

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णय घेतला. याविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने कुलपती (राज्यपाल) भगतसिंग कोश्‍यारी यांना निवेदन सादर केले. त्यानंतर कुलपतींनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णय फेटाळून लावत, राज्यपालांचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले. विशेष म्हणजे अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत गेल्या अडीच ते तीन महिन्यात राज्यपाल आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठका घेतल्या.

नागपूर  : राज्यातील अकृषी विद्यापीठांमध्ये अंतिम वर्षाच्या शेवटल्या सत्रातील परीक्षा रद्द करण्याची भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली. या निर्णयावरुन सध्या राज्यपाल, अभाविप आणि भाजपाकडून कडाडून विरोध करण्यात येत आहे. मात्र, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी या भूमिकेचे समर्थन करीत, सध्यातरी अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे विद्यापीठाला न झेपणारे काम असल्याने त्या रद्द करणे हा निर्णय योग्यच असल्याची प्रतिक्रिया सकाळशी बोलताना दिली आहे.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णय घेतला. याविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने कुलपती (राज्यपाल) भगतसिंग कोश्‍यारी यांना निवेदन सादर केले. त्यानंतर कुलपतींनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णय फेटाळून लावत, राज्यपालांचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले. विशेष म्हणजे अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत गेल्या अडीच ते तीन महिन्यात राज्यपाल आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठका घेतल्या.

हेहि वाचा : खाण पर्यटनाकडे पर्यटकांनी फिरवली पाठ, ही आहेत कारणे...

त्यामध्ये दोन ते तीन बैठकांमध्ये डॉ. काणे यांनी स्वत: या विषयावर शिक्षणमंत्र्यांशी संवाद साधला होता. यावर बोलताना, डॉ. काणे म्हणाले, सध्या परीक्षा घेण्यासंदर्भात राज्यातील एकाही अकृषी विद्यापीठात वातावरण आणि परिस्थिती नाही. यावर कुठल्याच विद्यापीठाकडे पर्याय नाही. त्यामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्येच परीक्षा घेणे योग्य ठरेल. एखाद्यावेळी सत्र लांबले तरी त्याला कुणाची हरकत नसावी. परीक्षा घेण्याची कुणीही घाई कोणत्याही विद्यापीठाने चुकीचे आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम करणारे ठरेल असेही ते म्हणाले.

गुणवत्तेचे निकष काय?

राज्यातील विद्यापीठांमध्ये शेवटल्या सेमिस्टरच्या परीक्षा न घेणे म्हणजे गुणवत्ता नसलेली पदवी देणे असे बोलल्या जात आहे. मात्र, त्याच वेळी पहिले ते पाचवे, सातवे, नवव्या सेमिस्टरपर्यंत केवळ 50 टक्के इंटरर्नल आणि 50 टक्के मागच्या सेमिस्टरच्या गुणाचा आधार घेत, ऍव्हरेज गुण देत विद्यार्थ्याला समोरच्या सत्रात पाठविणे कितपत गुणवत्तापूर्ण आहे ? असा सवाल डॉ. काणे यांनी उपस्थित केला.

ती पदवीही एका अर्थाने चुकीची ठरणारी नाही का? असेही ते म्हणाले. याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे पाच, सात आणि नऊ सत्र सातत्याने अभ्यास करुन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्याने एका सेमिस्टरची परीक्षा न देता, त्याला नऊ सत्राच्या आधारावर पदवी दिल्यास काय? वावगे ठरणार आहे, याबाबतही विचार करावा लागणार असल्याचे ते म्हणाले.

राजकारण होतय

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांवरुन संघटना आणि नेते राजकारण करीत असल्याची टिका डॉ. काणे यांनी केली. हे राजकारण न होता, सध्या जे विद्यार्थ्यांच्या हिताचे आहे, तेच व्हायला हवे असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What the former vice-chancellor said about the final year exams