अखेर मुंढेंच्या मनासारखे काय झाले? वाचा सविस्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

What happened abot Mundhe? Read detailed

मनपा आयुक्त म्हणून कोरोनावर नियंत्रणाच्या प्रयत्नात असताना राज्य सरकारने २६ ऑगस्टला त्यांची बदली महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सदस्य सचिवपदी बदली केली. अचानक बदली झाल्याने त्यांना तसेच नागपूरकरांनाही धक्का बसला होता. तत्पूर्वी २४ ऑगस्टला त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ते नागपुरातच होते.

अखेर मुंढेंच्या मनासारखे काय झाले? वाचा सविस्तर

नागपूर : पंधरा दिवसांपूर्वी महापालिका आयुक्तपदावरून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी बदली झालेले तुकाराम मुंढे यांची आज बदली रद्द करण्यात आली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात बदली झाल्याने मुंढेही समाधानी नव्हते. त्यांना मोठ्या जबाबदारीची अपेक्षा होती, असे समजते. त्यामुळे अखेर त्यांच्या मनासारखे झाल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात रंगली आहे. अद्याप कुठलीही जबाबदारी मिळाली नसल्याचे मुंढे यांनी ‘सकाळ'सोबत बोलताना सांगितले.

मनपा आयुक्त म्हणून कोरोनावर नियंत्रणाच्या प्रयत्नात असताना राज्य सरकारने २६ ऑगस्टला त्यांची बदली महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सदस्य सचिवपदी बदली केली. अचानक बदली झाल्याने त्यांना तसेच नागपूरकरांनाही धक्का बसला होता. तत्पूर्वी २४ ऑगस्टला त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ते नागपुरातच होते.

त्यांनी पुन्हा चाचणी केल्यानंतर कोरोना अहवाल निगेटिव्ह आला. ते उद्या, शुक्रवारी नागपूरहून मुंबईला रवाना होणार, त्यापूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी झालेली बदली रद्द झाल्याचे वृत्त नागपुरात पोहोचले. मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदाचा कार्यभार देत राज्य सरकारने मुंढे यांची बदली रद्द केली.

बिल्डरला चाप; जुन्या अपार्टमेंटच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा, वाचा सविस्तर

मुंढे यांना अद्याप कुठलीही जबाबदारी देण्यात आली नाही. परंतु त्यांच्या क्षमतेनुसार त्यांना जबाबदारी दिली जाईल, अशी चर्चा आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदावर बदली झाल्याने मुंढे निराश होते, असे समजते. अखेर राज्य सरकारने त्यांना दिलासा दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.

नागपुरातच बदलीची चर्चा
मुंढे यांची बदली रद्द झाल्याचे वृत्त येताच शहरवासींत उत्सुकता निर्माण झाली. ते पुन्हा आयुक्तपदी येणार, अशी चर्चा रंगली. अनेकांनी एकमेकांना फोन करून मुंढे आयुक्तपदी परत येणार काय? अशी विचारणा केली. अनेकांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनाही फोन करून विचारणा केली. परंतु महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी ते आता जाणार नाही, पण आयुक्तपदीही येणार नसल्याचे कळताच अनेकांची निराशा झाली.

आज सोडणार नागपूर
माजी आयुक्त तुकाराम मुंढे उद्या, शुक्रवारी नागपूर सोडणार आहेत. ते मुंबईला जाणार आहेत. नागपूरकरांनी खूप प्रेम दिले. प्रतिकूल परिस्थितीशी लढण्याचे बळ दिले, त्यामुळे त्यांचे उपकार कायम राहतील, असे त्यांनी सांगितले.
 

Web Title: What Happened Abot Mundhe Read Detailed

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top