काहीही होऊ दे पर्यटनाला जाणारच, काय सांगतो हा सर्व्हे...

Whatever Happens, Go For Tourism
Whatever Happens, Go For Tourism

नागपूर,:  पर्यटन हा आता अनेकांच्या जीवनाचा एक भाग झाला आहे. यंदा कोरोनामुळे ही संधी हुकली असे मत 81 टक्के नागरिकांनी एका सर्व्हेमध्ये नोंदविले. दी इंडियन लक्‍झरी ट्रॅव्हलरने हा सर्व्हे केला आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका पर्यटन व्यवसायाला बसला असताना टाळेबंदी संपल्यानंतर पर्यटनाला जाणारच असे मत 21 टक्के तर परिस्थितीचा अंदाज घेऊन आपण जाणार असे मत 49 टक्के नागरिकांनी व्यक्त केले. 


जागतिक पर्यटन संघटनेच्या अहवालानुसार जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीत आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या संख्येत 22 टक्के घट झाली होती. कोरोनाचा धोका वाढल्यावर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवासावर बंधने घालण्यात आली. त्याचाही फटका पर्यटन व्यवसायाला बसला. या धक्‍क्‍यातून पर्यटन व्यवसाय कसा सावरू शकतो, यासंदर्भात चाचणी करण्याच्या उद्देशाने दी इंडियन लक्‍झरी ट्रॅव्हलरने देशभरातील 3500 नागरिकांची मते जाणून घेतली. त्यानुसार 31 टक्के पर्यटकांनी कमी खर्चाच्या आणि आरामदायी पर्यटनासाठी मालदीव आणि मध्य युरोपला 31 टक्के पसंती दिली. त्यानंतर दक्षिण युरोप, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंडमध्ये (प्रत्येकी 30 टक्के), भूतान आणि श्रीलंकेतील पर्यटनाला अनुक्रमे 28 आणि 27 टक्के पर्यटकांनी पसंती दिली आहे. 


नियमित देशांर्तगत पर्यटन करण्यापैकी 43 टक्के पर्यटकांनी आम्ही पर्यटनाला जाणारच असे म्हटले आहे. तर, 43 टक्के पर्यटकांनी परिस्थिती व आरोग्याची सुरक्षितता लक्षात घेऊनच पर्यटनाला पसंती राहील असे म्हटले आहे. अशा पर्यटकांनी पर्यटन सुरू झाल्यानंतर गोव्याला पहिली पसंती दिली आहे. त्याखालोखाल 48 टक्के पर्यटकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव न राहणाऱ्या ठिकाणांना पसंती दिली आहे. 44 टक्के पर्यटकांनी हिमाचल प्रदेश, 31 टक्के लेह-लद्दाख आणि सिक्कीम, 28 टक्के केरळ आणि उत्तराखंड तर अंदमान-निकोबार, राजस्थानला अनुक्रमे 25 व 23 टक्के पर्यटकांनी पसंती दाखवली. कोणत्या प्रकारच्या पर्यटनाला पसंती देणार असे विचारले असता 64 टक्के पर्यटकांनी पर्वतीय क्षेत्राला, 56 टक्के समुद्रकिनारे, 29 टक्के पर्यटकांनी वन्यजीव सफारी आणि "वेलनेस' आणि 56 टक्के पर्यटकांनी निसर्गाच्या सान्निध्यात फिरायला जाण्याचा मनसुबा व्यक्त केला आहे. 


पर्यटनाला गेल्यानंतर निवासासाठी 38 टक्के पर्यटकांनी विश्‍वासार्ह हॉटेलच्या श्रेणीला पसंती दिली तर जेवणाची व राहण्याची उत्तम व्यवस्था असलेल्या हॉटेलला 20 टक्के तर 17 टक्के पर्यटकांनी होमस्टेची निवड केली. 25 टक्के पर्यटकांनी खासगी विला अथवा अपार्टमेंटमध्ये राहण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. 53 टक्के पर्यटकांनी विमानसेवा अथवा स्वतःच्या वाहनाने पर्यटनाला जाण्यास इच्छुक असल्याचे म्हटले आहे. 32 टक्के पर्यटकांनी स्वतःच्या वाहनाने तर 15 टक्के पर्यटकांनी विमानाने जाईल असे म्हटले आहे. 

कोरोनानंतर पर्यटनाला गेल्यावर अडचणीचे किंवा त्रासदायक ठरणाऱ्या मुद्यावरही अनेकांनी आपली मते व्यक्त केली आहेत. त्यात 10 टक्के पर्यटकांनी काहीच अडचणी नसल्याचे सांगितले आहे. तर 22 टक्के पर्यटकांनी रोख रक्कम देणे, 23 टक्के पर्यटकांना फिटनेस क्‍लब, 32 लोकांना जेवणासाठी पुन्हा वापरण्यात येणाऱ्या प्लेटस, 38 टक्के पर्यटकांनी विमानतळ व विमानात बसून प्रवास करणे, 55 टक्के पर्यटकांनी नियमित स्पर्श होणाऱ्या जागेवर स्पर्श करण्याची अडचण, गर्दीच्या ठिकाणी इतरांसोबत रांगेत उभे राहण्यात 64 टक्के, सामाजिक अंतर व नियमानुसार स्वच्छता केल्या जाईल की नाही याबद्दल शाश्‍वती नसल्याचे 75 टक्के पर्यटकांचे म्हणणे आहे. 

स्वच्छतेसाठी ज्यादा पैसे मोजण्यास तयार 
आरामदायी पर्यटनासाठी स्वच्छतेसाठी ज्यादा पैसे देण्यास तयार असल्याचे 53 टक्के पर्यटकांनी मत व्यक्त केले आहे. 37 टक्के पर्यटकांनी एक रात्रीचे जास्तीचे पैसे देण्याची तयारी आहे. मात्र, आम्ही राहण्यासाठी येण्याच्या आदल्या दिवशीच्या रात्री ती रूम भाड्याने देण्यात येऊ नये म्हटले आहे. 37 टक्के पर्यटकांनी हॉटेलमध्ये राहण्यासाठी कोणतेही अधिकचे पैसे देणार नसल्यासे स्पष्ट केले आहे. 

 
दी इंडियन लक्‍झरी ट्रॅव्हलरने केलेल्या सर्वेमध्ये पर्यटकांनी पर्यटनाला जाणारच असे म्हटले आहे. हे आमच्या उद्योगाला नवसंजीवनी देणारे ठरणार आहे. त्यादृष्टीने आम्हीही पर्यटकांना चांगले व आरोग्यदायी सोयी देण्यासाठी कटिबद्ध आहोत. 
आदित्यशेखर गुप्ता, सहसचिव विदर्भ टुरिझम असोसिएशन 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com