कुणी व्हिलचेअर देता हो... रुग्णाला व्हिलचेअर

Who gives a wheelchair ... Wheelchair to the patient
Who gives a wheelchair ... Wheelchair to the patient
Updated on

नागपूर : "आई आहे. चालता नाई येत. थो बसू पन नाई शकत... व्हीलचेअर नाहीतर स्टेचर तरी द्या...' अशी विनवणी केली; परंतु कुणीही लक्ष दिले नाही. स्टेचरवर एक रुग्ण आधीच होता. परिचर काहीच करू शकत नव्हता. अखेर रुग्ण महिलेने येथे लावण्यात आलेल्या रेलिंगचा आधार घेतला. मात्र, बराच वेळ ना व्हीलचेअर मिळाली ना स्टेचर. मेडिकलच्या प्रवेशद्वारावरील ही घटना. येथे तैनात परिचर रुग्ण घेऊन नुकताच निघाला होता. परिचारिकांना कॉल आल्यानंतर त्या लगतच्या बाह्यरुग्ण विभागाच्या सर्जरी कक्षात होत्या. अखेर त्या मातेला आधार देत कक्षात आणले. संताप आणणारा हा प्रकार मेडिकलमध्ये सोमवारी (ता. 2) निदर्शनास आला.

मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी आलेल्या रुग्णाला या प्रसंगाला सामोरे जावे लागले. मेडिकलमधील डॉक्‍टटरांनी नंतर तपासले. भरती केले. भोवळ येत असल्याने ती रुग्ण महिला ऑटोतून उतरू शकत नव्हती. परंतु, ऑटो अधिक काळ प्रवेशद्वारावर थांबविता येत नाही. सुरक्षारक्षकांच्या शिट्टया सुरू होतात. असे प्रकार घडत असतानाही मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागात व्हीलचेअरची संख्या वाढविण्यात येत नाही. वॉर्डातून बाह्यरुग्ण विभागात स्टेचर आणू देत नाही. उभे राहण्याइतके बळ त्या रुग्ण महिलेच्या पायात नव्हते. त्यामुळे कुठे स्टेचर, व्हीलचेअर मिळते का, हे शोधत नातेवाईक बघत होते; परंतु कोणीही दाद देत नव्हते. काही वेळानंतर त्यांना व्हीलचेअर मिळाली.
गरिबांच्या आजारांवर, त्यांच्या वेदनांवर उपचारांसाठी वर्षाला कोट्‌यवधीचा निधी शासन खर्च करते. परंतु, गरिबांना येथे व्हीलचेअर, स्टेचर मिळत नाही. रक्ताचे अहवाल वेळेवर मिळत नाही.

परिचारिकांचे कौतुक

मेडिकलच्या प्रवेशद्वारावर दोन इन्चार्ज सिस्टर तैनात होत्या. साठीतील एक रुग्णाला दोनवेळा परत पाठविल्याने हा रुग्ण एका ठिकाणी उभा होता. त्याला भोवळ येत असताना एका इन्चार्ज सिस्टरने त्याला सांभाळले. एमएलसी केस असल्याने मुख्य वैद्यकीय अधिकारी यांच्या कक्षात नेले. त्यानंतर लगेच परत येत, या रुग्ण महिलेची स्थिती बघून त्यांना व्हीलचेअर उपलब्ध करून देण्यासाठी त्या धावाधाव करीत होत्या. येथील दोन्ही परिचारिकांचे एका ज्येष्ठ व्यक्तीने कौतुकही केले. ख?्‌‌‌‌‌‌‌या अर्थाने त्या परिचारिका आपले कर्तव्य करीत होत्या. एका कर्मचा?्‌‌‌‌‌‌‌याला विचारले असता, कांबळे आणि जनबंधू अशी या परिचारिकांची नावे असल्याचे कळले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com