चौकाचौकांत कोण करीत आहे कोरोनाचा प्रसार? वाचा सविस्तर

Who is promoting Corona at the crossroads?
Who is promoting Corona at the crossroads?
Updated on

नागपूर : कोरोनावर नियंत्रणासाठी सर्व स्तरावर प्रयत्न केले जात असताना शहरातील चौकाचौकांमध्ये फिरणाऱ्या भिक्षेकऱ्यांकडे दुर्लक्ष होत आहे. चौकात चारचाकी वा दुचाकी वाहन थांबताच कडेवर लहान मूल घेऊन महिला भिक्षेकरी अक्षरशः वाहनधारकांच्या तोंडापर्यंत हात पुढे करीत आहेत. कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी आवश्यक मास्कचाही भिक्षेकरी वापर करीत नाहीत. त्यामुळे भीतीने वाहनधारक चौकातून पळ काढण्याचा प्रयत्न करीत असून यातून अपघाताची शक्यता बळावली आहे.
शहरात चौकांमध्ये भिक्षेकऱ्यांचे साम्राज्य असून त्यावर पोलिस, महापालिका प्रशासनही या समस्येवर उपाय शोधण्यात अपयशी ठरले आहे. चौकांत वाहनांपुढे, मागे करणाऱ्या या भिक्षेकऱ्यांमुळे वाहनधारक कोरोनापूर्वीही त्रस्त होते अन् आता कोरोनाच्या काळात अधिकच त्रस्त झाले आहेत. चौकांमध्ये हे भिक्षेकरी मास्क न लावता बिनधास्त वावरत आहेत.

मे महिन्यात दोन तीन भिक्षेकऱ्यांना कोरोना झाल्याचे आढळून आले होते. त्यानंतर एकालाही कोरोना झाल्याचे आढळले नाही. कदाचित त्यांची रोगप्रतिकार शक्ती उत्तम असल्यामुळे त्यांना संक्रमण झाले नसेल, परंतु ते कोरोना पसरविण्यास सहायक ठरू शकतात, अशी चर्चा आहे. या भिक्षेकऱ्यांवर नियंत्रण आणण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

चौकांत सिग्नल बंद झाल्यानंतर अनेक वाहने चौकांत थांबतात. कुठलेही मास्क न वापरता वाहनाच्या खिडकीतून वाहनधारकांच्या थेट तोंडापर्यंत हात पुढे केले जात आहे. एवढेच नव्हे तर दुचाकीधारकांना अगदी खेटून उभे राहताना दिसून येत. चिमुकल्याला कडेवर घेऊन वाहनधारकांकडे पैशासाठी याचना करणाऱ्या महिला भिक्षेकरी प्रत्येक चौकांत दिसून येत आहेत.

भिक्षेकरी वाहनाकडे येताना बघून संक्रमणाच्या भीतीने वाहनधारक पळ काढत असल्याचेही दिसून येते. भिक्षेकऱ्यांमुळे अनेकजण सिग्नल तोडून करून पुढे पळतात. भिक्षेकऱ्यांपासून कोरोना टाळण्यासाठी वाहनधारकांकडून वाहतूक नियमांची पायमल्ली होत आहेतच शिवाय जीवावर बेतण्याचीही शक्यता बळावली आहे.

बेघरांसाठीचे निवारे बंद
लॉकडाऊनच्या काळात महापालिकेने बेघरांसाठी दहाही झोनमध्ये १८१ निवारे तयार केले होते. लॉकडाऊनदरम्यान भिक्षेकऱ्यांना निवासासह जेवणही येथे मिळत होते. विविध सामाजिक संस्थांच्या देणगीतून भिक्षेकऱ्यांना दोन वेळचे जेवण मिळत होते. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणि मिशन बिगिन अगेनअंतर्गत सर्वच सुरू झाल्यानंतर हो निवारेही इतिहासजमा झाल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपर्यंत या निवाऱ्यांत जेवण मिळत होते. तेही बंद झाल्याने भिक्षेकरी पुन्हा रस्त्यावर आले आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com