esakal | आयुक्त मुंढेंना आता कुणी दिला इशारा ?
sakal

बोलून बातमी शोधा

Who warned Commissioner Mundhe?

कुठल्या दबावात डॉ. गंटावार दाम्पत्यावर कारवाई करीत नाही, ते आयुक्तांनी स्पष्ट करावे, असेही दयाशंकर तिवारी यांनी नमूद केले. डॉ. गंटावार यांनी विमा दवाखान्यासाठीही खोटी बिले सादर केली. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनीही ताशेरे ओढले आहे.

आयुक्त मुंढेंना आता कुणी दिला इशारा ?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर, ता. 2 : सभागृहात संपूर्ण पुरावे दिल्यानंतरही आयुक्त तुकाराम मुंढे डॉ. प्रवीण गंटावार व त्यांच्या पत्नी शिलू गंटावार यांच्यावर कारवाई करण्याचे टाळत आहे. गंटावार दाम्पत्यांवर आयुक्तांचे प्रेम का? असा सवाल करीत ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी कारवाई न केल्यास आयुक्तांविरोधात जनआंदोलन करणार, असा इशारा दिला. एवढेच नव्हे तर डॉ. गंटावाराबाबतची एक "ऑडिओ क्‍लिप' सार्वजनिक करणार असल्याचेही ते म्हणाले. 

महापालिकेतील स्थायी समिती सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सत्तापक्षनेते संदीप जाधव, स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके, प्रतोद दिव्या धुरडे आदी उपस्थित होते. सभागृहापूर्वीच आयुक्त मुंढे यांना स्वर्गीय मदन थूल यांनी डॉ. गंटावारांच्या प्रतापाची पूर्ण फाइल दिली. परंतु, आयुक्तांनी त्याकडेही दुर्लक्ष केले. शासकीय सेवेत असताना खासगी रुग्णालय चालविणे, डॉ. गंटावार यांच्या पत्नी डॉ. शिलू या मध्य प्रदेश कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आहेत.

डॉ. शिलू दर शुक्रवारी मध्य प्रदेशातील बैतुल येथील रुग्णालयात सेवा देतात. मात्र, महापालिकेच्या इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये त्यांची हजेरी डॉ. प्रवीण गंटावार लावतात. या बाबी पुराव्यासह आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. ऍन्टी करप्शन ब्युरोने डॉ. गंटावार दाम्पत्यावर अपसंपदेबाबत गुन्हा नोंदविला. मात्र, 24 तास उलटूनही आयुक्तांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली नाही.

महावितरण आर्थिक संकटात; ऊर्जामंत्र्यांनी केंद्राकडे केली ही मागणी

कुठल्या दबावात डॉ. गंटावार दाम्पत्यावर कारवाई करीत नाही, ते आयुक्तांनी स्पष्ट करावे, असेही दयाशंकर तिवारी यांनी नमूद केले. डॉ. गंटावार यांनी विमा दवाखान्यासाठीही खोटी बिले सादर केली. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनीही ताशेरे ओढले आहे. गंटावार दाम्पत्याला निलंबित न केल्यास आयुक्तांविरोधात जनआंदोलन उभे करणार असल्याचेही तिवारी म्हणाले.