कुणावर येतेय उपासमारीची पाळी...वाचा सविस्तर

Whose turn is the turn of starvation ... Read more
Whose turn is the turn of starvation ... Read more

नागपूर : राज्यातील ९ शासकीय अभियांत्रिकी आणि ४४ शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयांमधील तीन हजार अतिथी प्राध्यापकांचे मानधन थकले आहे. त्यामुळे अंशकालीन प्राध्यापकांवर उपासमारीची पाळी आली आहे.

नेट, सेट, पीएच.डी., एम.टेक. अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार शासकीय अभियांत्रिकी आणि तंत्रशिक्षण महाविद्यालयात तासिका तत्त्वावर नोकरी पत्करतात. अनेक वर्षांपासून प्राध्यापक भरती न झाल्याने त्यांना तुटपुंज्या मानधनावर सेवा द्यावी लागत आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये ६०० रुपये तास तर प्रात्यक्षिक वर्गाचा ३०० रुपये तास असे मानधन दिले जाते. महिन्याला आठ ते दहा हजार रुपये एवढे तुटपुंजे वेतन या प्राध्यापकांना मिळते.

महाविद्यालयातील कारकुनापेक्षाही या प्राध्यापकांना तीनपट कमी वेतनावर काम करावे लागते. त्यातही कहर असा की शासनाने ऑगस्ट २०१९ पासून या अभियांत्रिकी आणि तंत्रनिकेतनच्या प्राध्यापकांना मानधनच दिलेले नाही. त्यात टाळेबंदीच्या कालावधीमध्ये महाविद्यालये बंद असल्याने या काळातील मानधन मिळण्याची कुठलीही शक्यता नाही. त्यामुळे विद्यादानाचे काम करणाऱ्या या उच्चविद्याविभूषित प्राध्यापकांना किमान ऑगस्ट २०१९ पासून रखडलेले वेतन तरी द्यावे, अशी मागणी केली जात आहे. शासनाने वर्षभरापासून वेतन न दिल्याने स्वत:चा आणि परिवाराचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न, महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटना व शासकीय अभियांत्रिकी अंशकालीन प्राध्यापक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.


कायमस्वरूपी समायोजन करा
राज्यातील शासकीय अभियांत्रिकी आणि तंत्रनिकेतन महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे या जागांवर अतिथी प्राध्यापक म्हणून काम करीत असलेल्यांचे कायमस्वरूपी समायोजन करावे, अशी मागणी या प्राध्यापकांनी केली आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदनही पाठवण्यात आले आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com