आयुक्त मुंढे यांच्याविरोधात का वाढतोय व्यापाऱ्यांत रोष ? वाचा

Why growing anger among traders against Commissioner Mundhe?
Why growing anger among traders against Commissioner Mundhe?

नागपूर : आयुक्त तुकाराम मुंढे यांनी १८ ऑगस्टपर्यंत कोरोना चाचणी करण्याचा फतवा काढल्यानंतर तपासणीसाठी चाचणी केंद्रावर गेलेले व्यापारी व त्यांच्या कर्मचाऱ्यांना किट उपलब्ध नसल्याच्या कारणावरून परत पाठविण्यात आले. त्यामुळे व्यापाऱ्यांनी ‘आधी कोरोना चाचणीची सुविधा द्या, मग धमकी द्या‘, असा सूर लावला आहे. आयुक्तांच्या निर्णयाचे स्वागत आहे, परंतु आयुक्तांनी वास्तव्याचेही भान ठेवण्याची गरज व्यक्त करीत काही व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला.

मुंढे यांनी व्यापाऱ्यांना १८ ऑगस्टपर्यंत कर्मचाऱ्यांसह स्वतःची चाचणी करण्याचे निर्देश दिले आहे. अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही महिन्यांतील उत्पन्न बुडाले, आता सम-विषममुळेही व्यवसायावर टांगती तलवार असल्याने आधीच त्रस्त झालेल्या व्यापाऱ्यांत आयुक्तांच्या निर्णयाविरोधात संताप वाढत आहे.

या संतापात आता चाचणी केंद्रावर चाचणी किटची उपलब्धता नसल्याने आणखीच भर पडली आहे. आयुक्तांच्या फतव्यानंतर व्यापाऱ्यांनी महापालिकेच्या चाचणी केंद्रावर कालपासून तपासणीसाठी जाण्यास सुरुवात केली. लक्ष्मीनगर झोनमधील आरपीटीएस चाचणी केंद्रावर परिसरातील काही व्यापारी तसेच कर्मचारीही चाचणीसाठी गेले. परंतु तेथे उपस्थित असलेल्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने चाचणीसाठी आवश्यक किट उपलब्ध नसल्याचे या व्यापाऱ्यांना सांगितले.

आयुक्तांच्या निर्देशाचे पालन करण्यास गेलेल्या या व्यापाऱ्यांना चाचणीची सुविधाच नसल्याने परत यावे लागले. याच केंद्रावर आजही काही व्यापारी जाऊन आले. आजही त्यांना किटस नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे सलग दोन दिवस चाचणी केंद्रावर किट नसल्याने १८ ऑॅगस्टपर्यंत तपासणी कशी करणार? या प्रश्नाने व्यापाऱ्यांची झोप उडाली आहे. आयुक्तांच्या निर्देशाचे पालन करण्यास व्यापारी तयार आहे.

परंतु पालिकेने सुविधा तर उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी काही व्यापाऱ्यांनी केली. सुविधेच्या नावाने बोंब अन् आयुक्त धमकी देत आहेत. आयुक्तांनी वास्तव लक्षात घेऊन निर्णय घेण्याची गरज काही व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. सुविधा नसेल तर कुठे अन् १८ तारखेपर्यंत कशी तपासणी करणार? असा सवाल करीत व्यापाऱ्यांनाच लक्ष्य केले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे.

आयुक्तांचा दावा फोल
शहरात २१ ठिकाणी कोरोना चाचणीसंदर्भात सेवा केंद्र सुरू करण्यात आले असून त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ३ ऑगस्टला केले होते. मात्र आरपीटीएस चाचणी केंद्रावर दोन दिवसांपासून किटचा अभाव असल्याने आयुक्तांचा सेवा केंद्राचा दावा फोल ठरताना दिसून येत आहे.


आरपीटीएस सेवा केंद्रावर चाचणी किट नसल्याने परत आल्याचे काही व्यावसायिकांनी सांगितले. त्यामुळे स्वतः चाचणी केंद्रावर भेट दिली. तेथे किटच नसल्याचे तेथील अधिकाऱ्यांनीही सांगितले. दुकानदार तसेच त्यांच्याकडील कर्मचाऱ्यांच्या चाचणीसाठी महापालिकेने एखाद्या व्हनमध्ये मोबाईल चाचणी केंद्र सुरू करावे.
गोपाल बोहरे, माजी मगरसेवक
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com