पॉलिटेक्निककडे का वाढतोय विद्यार्थ्यांचा ओढा? वाचा सविस्तर

Why is the influx of students towards polytechnics? Read detailed
Why is the influx of students towards polytechnics? Read detailed
Updated on

नागपूर : राज्यात पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या १ लाख १७ हजार जागांसाठी ८७ हजारांवर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गेल्या काही वर्षात विद्यार्थ्यांनी तंत्रनिकेतनकडे पाठ फिरवल्यानंतर यंदा मात्र मोठ्या प्रमाणावर नोंदणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता पॉलिटेक्निककडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. पूर्व विदर्भात आलेल्या पुरामुळे नोंदणीला गुरूवारपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

व्यावसायिक अभ्यासक्रमातील प्रवेशाचे चित्र गेल्या पाच वर्षात आशादायी नाही. अभियांत्रिकी, पॉलिटेक्निक आणि इतर अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली. यामुळे या अभ्यासक्रमात रिक्त जागांची संख्या गेल्या पाच वर्षात बरीच मोठी आहेत. या प्रकाराने पाच वर्षात किमान पन्नासाहून अधिक महाविद्यालये बंद पडली, तर अनेक महाविद्यालयांनी या अभ्यासक्रमातील शाखा बंद करण्याचे प्रस्ताव विद्यापीठ आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडे दिलेत.

मात्र, यावर्षी दहावीचा निकालात २६ टक्क्यांनी वाढ झाली. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढणार असल्याचे भाकित सकाळने वर्तविले होते. त्यानुसार आतापर्यंत ८७ हजारांवर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यावर्षी राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता विभागाने तंत्रनिकेतन अभ्याक्रमाचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला. यामुळे यावर्षी विद्यार्थ्यांना घरून अर्ज भरता येणे शक्य होणार आहे. १० सप्टेंबरपर्यंत नोंदणीला दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे हा आकडा १ लाखापेक्षा अधिक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
वर्ष -    महाविद्यालय - एकूण जागा - रिक्त जागा
२०१७        ७१              २५,५९५        १६,४९१ 
२०१८       ६४               १७,६८४        ११,९४०
२०१९      ६४                १७,६८४         १३,९४० 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com