
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी होताच शिक्षण विभागाने पहिल्या टप्प्यात इयत्ता नववी ते बारावी आणि दुसऱ्या टप्प्यात इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू केल्या. शाळा सुरू आणि महाविद्यालय बंद का? या प्रश्नामुळे १५ फेब्रुवारीपासून शहरातील महाविद्यालयेही सुरू करण्यात आली.
नागपूर : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. शहरातही दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी लग्नसमारंभ आणि इतर कार्यक्रमांवर निर्बंध घातले. मात्र, अद्याप पाचवी ते बारावी आणि महाविद्यालये सुरूच आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मात्र, प्रशासनाकडून अद्याप कोणताही आदेश आला नसल्याने पालकांमध्ये चिंता वाढली आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी होताच शिक्षण विभागाने पहिल्या टप्प्यात इयत्ता नववी ते बारावी आणि दुसऱ्या टप्प्यात इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू केल्या. शाळा सुरू आणि महाविद्यालय बंद का? या प्रश्नामुळे १५ फेब्रुवारीपासून शहरातील महाविद्यालयेही सुरू करण्यात आली.
हेही वाचा - वाढत्या कोरोनामुळे शिक्षण मंडळाचे वाढणार टेन्शन; बोर्डाच्या परीक्षांवर विघ्न येण्याची शक्यता
शहर आणि ग्रामीण भागातील महाविद्यालयातील उपस्थिती समाधानकारक आहे. शहरात गेल्या दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यामुळे शाळा, शासन आणि पालकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. आतापर्यंत नागपूरच्या आजूबाजूच्या शहरांमध्ये वर्धा येथील स्थानिक प्रशासनाने तेथील महाविद्यालये आणि शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला.
त्या तुलनेत नागपुरात कोरोना बाधितांची संख्या अधिक आहे. मात्र, प्रशासनाने त्याबाबत कुठलेही धोरण अवलंबिले नसल्याचे दिसून येते. केवळ महापालिका आयुक्त नव्हे तर जिल्हाधिकाऱ्यांकडूनही त्याबाबत कुठलेच निर्देश दिलेले नाही. यामुळे पालकांची चिंता वाढली आहे.
नक्की वाचा - दारू पिऊन आरामाच्या तयारीत असताना 'त्यानं' काढलं रात्रपाळीचं फर्मान अन् घडला मृत्यूचा...
कोरोनामुळे सार्वजनिक कार्यक्रम रद्द झाले. मग शाळा, महाविद्यालय का सुरू, आहेत? लहान मुलांना शाळेत असताना जास्त प्रमाणात धोका संभवतो आहे.
हेमंत कान्हेड,
पालक
संपादन - अथर्व महांकाळ