esakal | अरे देवा... पहिल्याला सोडले, दुसऱ्यासोबत 'लिव्ह इन'मध्ये तरीही रात्री जायची तिसऱ्याकडे
sakal

बोलून बातमी शोधा

Wife murdered by husband in Nagpur

अलका अनेकदा रात्रभर कुठेतरी निघून जात होती. त्यामुळे सिद्धार्थची चिडचिड होत होती. या प्रकारामुळे सिद्धार्थ तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. याच कारणावरून दोघांत नेहमी वाद व्हायचा. त्यामुळे शेजारी ही त्यांच्या भांडणाकडे दुर्लक्ष करायचे.

अरे देवा... पहिल्याला सोडले, दुसऱ्यासोबत 'लिव्ह इन'मध्ये तरीही रात्री जायची तिसऱ्याकडे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर :  ती 35 वर्षांची असून, पती व मुले आहेत. तरीही तिचे विवाहबाह्य संबंध निर्माण झाले. तिने पती व मुलांना सोडून दुसऱ्यासोबत "लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहण्यास सुरुवात केली. दोन पुरुषांशी संबंध ठेऊनही तिचे मन काही भरले नाही. त्यामुळे तिने तिसऱ्या पुरुषासोबत संबंध प्रस्थापित केले. यामुळे ती रात्रीअपरात्री घराबाहेर पडयची अन्‌ पहायचे परतायची. सायंकाळी घराबाहेर गेलेली पत्नी रात्रभर घरी न आल्यामुळे पतीने खलबत्त्याने ठेचून खून केला. ही थरारक घटना बुधवारी दुपारच्या सुमारास वाडीत घडली. अलका सिद्धार्थ सोनपिपळे (वय 28, रा. सम्राट अशोक चौक) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. संशयित पती सिद्धार्थ प्रेम सोनपिपळे (वय 35) असे आरोपीचे नाव आहे.

क्लिक करा - Video : चला भिवकुंड... निसर्गाचे देखणे रूप डोळ्यात साठवू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सिद्धार्थ हा एमआयडीसीतील कंपनीत पेंटिंगचे काम करतो. तो पत्नी व मुलासह राहतो. त्याची ओळख विवाहित असलेली अलका हिच्याशी झाली. विवाहित असतानासुद्धा दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. अलकाने पती व मुलांना सोडून सिद्धार्थसोबत "लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहण्याचा निर्णय घेतला. दोघेही आंबेडकरनगरात किरायाने राहू लागले.

अलका अनेकदा रात्रभर कुठेतरी निघून जात होती. त्यामुळे सिद्धार्थची चिडचिड होत होती. या प्रकारामुळे सिद्धार्थ तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. याच कारणावरून दोघांत नेहमी वाद व्हायचा. त्यामुळे शेजारी ही त्यांच्या भांडणाकडे दुर्लक्ष करायचे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास दोघांमध्ये कडाक्‍याचे भांडण झाले. त्यामुळे अलका ही रात्रीला नऊ वाजताच्या सुमारास घर सोडून गेली. रात्रभर बाहेर घालविल्यानंतर पहाटे पाच वाजताच्या सुमारास परतली.

अधिक माहितीसाठी - घरी कोणीही नसल्याचे पाहून तो आला दहा मिनिट अंगणात चर्चा केली आणि...

त्यामुळे पतीने "तू रात्रभर कुठे गेली आणि कुठे राहिली' असे म्हणून भांडण सुरू केले. दोघांमध्ये बुधवारी सकाळपासून भांडण सुरू होते. वस्तीतच शेजारी एकाघरी अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती. डोक्‍यात संशयाचे भूत संचारलेल्या सिद्धार्थने दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घरातील लोखंडी खलबत्याने अलकाच्या डोक्‍यावर हल्ला केला. खलबत्याच्या एका प्रहारानेच अलका रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. त्यानंतरही आरोपी सिद्धार्थने पायाने तिच्या पोटावर व डोक्‍यावर मारले. त्यानंतर पुन्हा खलबत्याने डोके ठेचून अल्काची निर्घृण हत्या केली.

हेही वाचा - काय घडले रेल्वे रूळावर, रूहीचा मृतदेह कसा काय?

ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली

घराशेजारी अंत्यसंस्काराची सुरू असताना कुणाचेही याकडे लक्ष गेले नाही. घटनेनंतर आरोपी सिद्धार्थ हा बाहेरून कडी लावून पसार झाला. मात्र, रात्री दहाच्या सुमारास त्याने वाडी पोलिस ठाणे गाठून अलकाची हत्या केल्याची कबुली दिली. यावेळी कर्तव्यावरील पोलिस कर्मचाऱ्यांना ऐकूण धक्का बसला. सिद्धार्थवर विश्‍वास ठेवून पोलिसांनी त्याचे घर गाठले असता घरात रक्ताचा सडा पडलेला दिसला. याप्रकरणी वाडी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी सिद्धार्थला अटक केली.

go to top