उशिरा का होईना नरखेडकरांना सुचले शहाणपण, काय केले नागरिकांनी?

नरखेड: जनता कर्फ्यूमुळे बंद असलेली शहरातील बाजारपेठ.
नरखेड: जनता कर्फ्यूमुळे बंद असलेली शहरातील बाजारपेठ.
Updated on

जलालखेडा (जि.नागपूर ) : नरखेड शहर व तालुक्‍यात कोरोनाचा संसर्ग वाढत चाललाय. आजार फोफावण्यापूर्वीच खबरदारी घेणे अगत्याचे असते. परंतू नगर परिषदेने अगोदर घेतलेल्या निर्णयावर असहमती दर्शवून नागरिकांनी निर्णय धुळकावून लावला. शेवटी गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाचे रूग्ण दुपटीने वाढत असताना आता कुठे त्या निर्णयाशी सहमत होऊन नागरिकांनी अंमलबजावणी सुरू केली आहे. चला, "देर आये दुरूस्त आये', हे काही कमी नाही.

अधिक वाचा : बापरे! भूमिहीन शेतकऱ्यांच्या नावे शंभर कोटींचे कर्ज? ठगबाजांचा अखेर असा भरला घडा...

शंभर टक्‍के प्रतिसाद
नरखेड शहरात कोरोनाचे रुग्ण निघाल्यानंतर जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला होता. पण याची नागरिकांनी खिल्ली उडविण्या आली व जनता कर्फ्यूचा बोजवारा उडाला. यानंतर नरखेड शहारासाठी काल "कोरोना ब्लास्ट' निघाल्यानंतर नरखेडवासींमध्ये खळबळ उडाली व त्यांनी तीन दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर केला. आजचा कर्फ्यू शंभर टक्के पाळण्यात आला. "कोरोना ब्लास्ट' नंतर नरखेडकरांना शहाणपण सुचले व तीन दिवसांच्या जनता कर्फ्यूला सोमवारपासून सुरुवात झाली. नरखेडमध्ये कोविड आजाराची लागण झालेल्या रुग्णाची संख्या 19 झाली. ती साखळी तोडण्याकरिता सर्वसंमतीने गावात तीन दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. आज 27 ते29 जुलैपर्यंत हा कर्फ्यू राहणार आहे. आज पहिल्या दिवशी गावातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने व्यापाऱ्यांनी बंद ठेवली होती. औषधी दुकाने, बॅंक व शासकीय कार्यालये तेवढी सुरू होती. परंतु तिथेही ग्राहक व नागरिकांचा वावर फार कमी दिसून आला.

अधिक वाचा  : सावधान ! आता चोरांनाही वाटत नाही बरं, कोरोनाची भीती, कशी ते बघाच...

नागरिकांनी लावले होते प्रश्‍नचिन्ह
19जुलैला नरखेडमध्ये पहिल्यांदा चार रुग्ण आढळले होते. त्या रुग्णांची साखळी तोडण्याकरिता नगराध्यक्ष अभिजित गुप्ता यांनी गावातील वरिष्ठ डॉक्‍टर, व्यापारी संघ व वरिष्ठ नागरिकांशी विचारविनिमय करून 20ते25 जुलैपर्यंत जनता कर्फ्यू जाहीर केला होता.20 जुलैला जनता कर्फ्यूचे व्यापाऱ्यांसह नागरिकांनी काटेकोर पालन करून कडकडीत बंद पाळला होता. या कर्फ्यूवर प्रश्नचिन्ह निर्माण करून काही राजकारणी, व्यापाऱ्यांनी छुपा अजेंडा फिरवून 22 जुलैला व्यापारी प्रतिष्ठाने सुरू केलीत. नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचाच हा प्रकार होता.

अधिक वाचा : सावध व्हा, भांडणात मध्यस्थी करणे भोवले, थोडक्‍यात वाचला जीव, काय झाला प्रकार...

"येरे माझ्या मागल्या'
रविवारी शहरातील 9 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे सर्वांचे धाबे दणाणले. नऊपैकी काही रुग्ण जुन्या 4 रुग्णांच्या "हिस्ट्री'तील मेडिकलस्टोर संचालक आहे. सोशल मीडियावर जनता कर्फ्यूविरुद्ध बंड करणाऱ्यांना "ट्रोल' करणे सुरू झाले. दुपारी सर्व संमतीने तीन दिवसाचा जनता कर्फ्यू पाळायचे ठरले. सोमवारपासून शहरात शंभर टक्‍के बंद पाळण्यात आला. सर्व व्यापारी प्रतिष्ठानसह नागरिकांनीही स्वयंस्फुर्तीने कडकडीत बंद पाळला. बंदचा आज दुसरा दिवस होता. जनता कर्फ्यू कोण किती दिवस पाळतो की पुन्हा " येरे माझ्या मांगल्या' प्रमाणे फिस्कटतो, हे पुढील दोन दिवसात ठरेल.

देशी दारूची विक्री मात्र सुरूच
गावातील सर्व व्यापारी प्रतिष्ठान यात जीवनावश्‍यक वस्तू पुरवठा करणाऱ्या किराणा दुकानांचाही समावेश होता. परंतू शहरातील सर्व देशी दारूविक्रीची दुकाने मात्र सुरूच होती. दारू दुकानदारांस शहरापेक्षा स्वतःच्या कमाईचे जास्त महत्व असल्याची नागरिकांत चर्चा होती. त्यामुळे मदयपींची मात्र चंगळ असल्याचे चित्र होते.

                                                                   संपादन  : विजयकुमार राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com