esakal | मन सुन्न करणारी घटना! 'डिअर मॉम...आय लव्ह यू' लिहून सोडला जीव, आईनं फोडला एकच हंबरडा

बोलून बातमी शोधा

woman committed to suicide in mhalaginagr of nagpur crime news}

स्वाती एका बीपीओत काम करत होती. सोमवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास तिची आई चंदा या सीताबर्डी येथे गेली होती. स्वाती आनंद नारायण एन्क्लेव्ह येथे राहत होती.

मन सुन्न करणारी घटना! 'डिअर मॉम...आय लव्ह यू' लिहून सोडला जीव, आईनं फोडला एकच हंबरडा
sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : 'डिअर मॉम...आय लव्ह यू' असा संदेश मैत्रिणीच्या मोबाईलवर पाठवून आणि चिठ्ठी लिहून तरुणीने गळफास घेतल्याची घटना म्हाळगीनगरमध्ये घडली. स्वाती मनोहर ढवळे, असे या मृत तरुणीचे नाव आहे. तिच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा - धक्कादायक! भोंदूबाबाचा एकाच घरातील चौघींवर बलात्कार, भूत उतरविण्याचा केला होता बहाणा

स्वाती एका बीपीओत काम करत होती. सोमवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास तिची आई चंदा या सीताबर्डी येथे गेली होती. स्वाती आनंद नारायण एन्क्लेव्ह येथे राहत होती. ती घरी एकटीच होती. तिने मैत्रिणीच्या मोबाईलवर संपर्क साधला. तसेच मी आत्महत्या करीत आहे, असे मोबाईल बंद केला. छताच्या लोखंडी हुकला ओढणी बांधून गळफास घेतला. दरम्यान, मैत्रिणीने  चंदा यांना याबाबत माहिती दिली.

हेही वाचा - राज्यात मोठ्या भावाला रोखण्यासाठी काँग्रेसचे पटोले अस्र? राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चा 

चंदा या घरी परतल्यानंतर स्वाती गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांना दिसली. चंदा यांनी हंबरडा फोडला. एका शेजाऱ्याने हुडकेश्वर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच महिला पोलिस उपनिरीक्षक माधुरी वाघाडे यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला.पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे रवाना केला. पोलिसांनी स्वाती यांनी इंग्रजीमध्ये आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी जप्त केली. 'डिअर मॉम...आय लव्ह यू' असे चिठ्ठीत लिहिले आहे. स्वातीच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.