Video : चार एकर शेतीतून ३० क्विंटल तुरीचे उत्पन्न; परिश्रमाला उन्नतीचे फळ

Yield of 30 quintals of turi from four acres of farm marathi farmers news
Yield of 30 quintals of turi from four acres of farm marathi farmers news

गुमगाव (जि. नागपूर) : अस्मानी संकटामुळे तुरीच्या पिकामध्ये आंतरपीक म्हणून घेतलेले सोयाबीनचे पीक नाहीसे झाले. चार एकरातील मातीमोल झालेल्या सोयाबीनची चिंता सोडून उरलेल्या तूर पिकाचे योग्य नियोजन आणि उत्कृष्ट व्यवस्थापन केल्याने ४५ वर्षीय मेघनाथ साठवणे यांच्या परिश्रमाला सध्या उन्नतीचे फळ मिळत असल्याचे दिसून येत आहे. शेतातील तुरीचे पीक जोमात आहे. सोयाबीनने घात केल्यानंतर तुरीची मिळालेली साथ साठवणे यांना लाखमोलाची ठरणार आहे.

हिंगणा तालुक्यातील गुमगाव येथील मेघनाथ मोतीराम साठवणे यांनी चार एकरमध्ये तुरीच्या पिकामध्ये सोयाबीनची आंतरपीक म्हणून लागवड केली. मात्र, अस्मानी संकटामुळे सोयाबीन पीक पूर्णपणे मातीमोल झाले. हाती काहीच मिळणार नसल्याने साठवणे यांनी कापणीच टाळली. परंतु, खचून न जाता शेतीविषयक ज्ञानाच्या अनुभवातून शेतातील तुरीच्या पिकाची सध्या चांगली वाढ झाली आहे.

परिस्थितीवर मात करून रात्रंदिवस केलेली मेहनत, खताचा योग्य वापर, पाण्याचे आणि औषध फवारणीचे योग्य नियोजन आणि शेतीविषयक ज्ञानाच्या अनुभवातून लवकरच तुरीचे पीक काढणीवर येणार आहे. सोयाबीन हातातून गेल्यानंतर चार एकर शेतीमध्ये साठवणे यांना २८ ते ३० क्विंटल तुरीचे उत्पन्न होण्याचा अंदाज आहे. सोयाबीनने मारल्यानंतर तुरीने तारल्याने तुरीचे पीक साठवणे यांना लाखमोलाचे ठरणार आहे.

तुरीचे अक्षरशः जंगल

परिसरात अनेकांनी तूर लागवड केली आहे. मात्र, साठवणे यांच्या तुरीच्या तुलनेत अन्य शेतकऱ्यांच्या झाडांची संख्या, उंची आणि शेंगांच्या प्रमाणामध्ये कमालीची तफावत आहे. चार एकर क्षेत्रात तुरीचे अक्षरशः जंगल निर्माण झाले आहे. तूर झाडाखाली गेलेला व्यक्ती दिसतही नाही. सध्या साठवणे यांची तूर परिसरातील अनेकांच्या आकर्षणाचा विषय ठरली आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com