esakal | ‘मौसी मैं जा रहा हूं...’ असं म्हंटलं अन् अचानक बंद झाला युवकाचा आवाज; गळफास लावून संपवलं जीवन  
sakal

बोलून बातमी शोधा

Young boy end his life in Nagpur

नागपुरात  राहणाऱ्या काकांकडे आलेल्या बिहारच्या युवकाने मावशीला फोनवरून आत्महत्या करीत असल्याचे सांगत घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सायंकाळी पाज वाजताच्या सुमारास सदरमध्ये उघडकीस आली.

‘मौसी मैं जा रहा हूं...’ असं म्हंटलं अन् अचानक बंद झाला युवकाचा आवाज; गळफास लावून संपवलं जीवन  

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर ः नागपुरात गेल्या काही दिवसांपासून आत्महत्यांच्या प्रमाणात वाढ होत चालली आहे. मानसिक तणाव, पैशाची चणचण अशा अनेक कारणांमुळे लोकं आत्महत्या करत आहेत. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये सर्वाधिक जण हे तरुण आहेत. अशीच एक घटना शहरातील सादर या भागात घडली आहे.

नागपुरात  राहणाऱ्या काकांकडे आलेल्या बिहारच्या युवकाने मावशीला फोनवरून आत्महत्या करीत असल्याचे सांगत घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सायंकाळी पाज वाजताच्या सुमारास सदरमध्ये उघडकीस आली. सुजीत कुमार (१८, रा-जहानबाद, बिहार) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

हेही वाचा - घरी काम करणाऱ्या मजुरांनी स्लॅब टाकण्याची केली तयारी अन् तेवढ्यात आला धडकी भरवणारा आवाज

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजीत कुमारचे काका मूळचे बिहारचे असून नागपुरातील महालेखाकार (एजी) कार्यालयात कर्मचारी आहेत. ते पत्नी व मुलांसह एजी ऑडीट कर्मचारी क्वॉर्टर्समध्ये राहतात. मात्र, लॉकडाऊनपासून त्यांची पत्नी माहेरी राहत होती. गेल्या तीन महिन्यांपूर्वी सुजीत काकांकडे राहायला आला होता. सुजीतने नुकताच अकराव्या वर्गात प्रवेश घेतला होता. तो एकलकोंडा राहत होता. 

सोमवारी नेहमीप्रमाणे सुजीतचे काका साडेनऊ वाजता ड्युटीवर निघून गेले. दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास त्याने बिहारमध्ये राहणाऱ्या मावशीला फोन केला. काही वेळ बोलणे झाल्यानंतर त्याने ‘मौसी मैं जा रहा हूं...’ असे म्हटले. त्‍यामुळे त्याची मावशी घाबरली. तिचा फोन सुरू असतानाच सुजीतने पंख्याला दोरी बांधली आणि गळफास घेऊन आत्महत्या केली. 

क्लिक करा -सालेकसातील शेतात आढळला मांजरीसारखा दिसणारा प्राणी; जवळ जाऊन बघितले असता अंगाचा उडाला थरकाप

मावशीने लगेच सुजीतच्या काकाला फोन करून माहिती दिली.त्यांना कार्यालयातून धावतच घर गाठले. शेजाऱ्यांच्या मदतीने दार तोडले. मात्र. तोपर्यंत खूप उशिर झाला होता. या प्रकरणी सदर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

संपादन - अथर्व महांकाळ