अपघाताची माहिती होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सोज्वळ सुंदर दिसणारा निखिल बारावी पास झाला होता व वडिलास व्यवसायात मदत करीत होता. बेला पोलिस ठाण्याचे जमादार अजय चौधरी यांनी जखमीस उपचारार्थ तर मृतास शवविच्छेदन व उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात रवाना केले.
बेला (जि. नागपूर) : कापडाचे प्रतिष्ठित व्यापारी रामचंद्र रोडे यांचा एकुलता एक मुलगा निखिल (वय १९) याचे ट्रॅक्टर दुचाकीच्या धडकेत निधन झाले. यापूर्वी सहा वर्षांअगोदर त्यांची त्रिवेणी नामक मुलगी आकस्मिक दगावली. रामचंद्र व भारती रोडे या दाम्पत्याचा आधारस्तंभ कोसळला. आकस्मिक निधनाची वार्ता गावात येताच बेला गावात दुःखाचे सावट पसरले.
रविवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास निखिल व वैभव ही दोघे चुलत भावंडे दुचाकीने बुटीबोरीवरून बेला गावाकडे येत होते. चिमणाझरी महामार्गावर असताना मागाहून आलेल्या भरधाव अज्ञात ट्रॅक्टरने त्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये निखिलचा जागीच मृत्यू झाला. मागे बसलेला वैभव जखमी झाला व बेशुद्ध पडला.
अपघाताची माहिती होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सोज्वळ सुंदर दिसणारा निखिल बारावी पास झाला होता व वडिलास व्यवसायात मदत करीत होता. बेला पोलिस ठाण्याचे जमादार अजय चौधरी यांनी जखमीस उपचारार्थ तर मृतास शवविच्छेदन व उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात रवाना केले.
हेही वाचा - डोळ्यांना कमी दिसत असल्याने सासऱ्याने रक्कम दिली जावयाकडे; मात्र, केला विश्वासघात
बेला पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, अज्ञात ट्रॅक्टरचालकाचा तपास सुरू आहे. सोमवारी गावकऱ्यांच्या उपस्थितीच निखिलवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दुकानदारांनी दिवसभर बाजारपेठ बंद ठेवून शोक पाळला व श्रद्धांजली अर्पण केली.
संपादन - नीलेश डाखोरे