पाच महिन्यांनी झाली सभा अन् ठरली सर्वाधिक खर्चिक, वाचा संपूर्ण प्रकार

The Zilla parishad general meeting was the most expensive
The Zilla parishad general meeting was the most expensive

नागपूर : अनेक अडथळ्यांनंतर जिल्हा परिषदेची सभा झाली. इतर सभांच्या तुलनेत यावर चारपट खर्च झाल्याची माहिती समोर आली. अवजवी खर्चही करण्यात आला. ही सभा सर्वाधिक खर्चिक ठरली. काही काम परस्पर देण्यात आल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, अनेकांना सॅनिटायझर न मिळाल्याने गेले कुठे, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

कोरोनामुळे जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा गेल्या पाच महिन्यांपासून झाली नव्हती. सर्वसाधारण सभा न झाल्यामुळे अनेक कामे प्रलंबित असल्याची ओरड सदस्यांकडून होत होती. त्यामुळे सभा घेण्यासाठी सातत्याने प्रयत्नही सुरू होते. लॉकडाउनच्या काळातसुद्धा प्रयत्न करण्यात आले. परंतु, जिल्हाधिकाऱ्यांनी नकार दिला. अनलॉक झाल्यानंतर पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरी मागण्यात आली. त्यांनी होकार दिल्यानंतर सभागृह उपलब्ध होत नव्हते.

जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून वनामतीचे सभागृह निश्‍चित झाले. त्यानुसार २४ जुलैला सभा पार पडली. अध्यक्षा रश्मी बर्वे यांना क्वारंटाइन व्हावे लागल्याने उपाध्यक्षांकडे धुरा आली. कोरोना लक्षात घेता आवश्यक सुविधा ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार सॅनिटायझर खरेदी करण्यात आले.

हे सॅनिटायझर ज्या प्रमाणात खरेदी करण्यात आले, त्याप्रमाणात सदस्यांना मिळाले नसल्याची ओरड झाली. त्यामुळे सॅनिटायझर गेले कुठे, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. पहिल्यांदाच कामकाज कॅमेराबद्ध करण्यात आले. याचे कंत्राट एका व्यक्तीला देण्यात आले; परंतु याकरता कोणत्याही प्रकारचे कंत्राट काढण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले.

खर्च अवाजवी झाल्याची चर्चा

सूत्रांकडून मिळलेल्या माहितीनुसार, याच माध्यमातून अध्यक्षा बर्वे कामकाज घरी बसून पाहणार होत्या; परंतु त्यांना रेकॉर्डिंग पाहावे लागले. यावरून त्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. ऐरवी सभेचा खर्च २० ते ३० हजारांच्या घरात असतो. या सभेवर खर्च लाखाच्या घरात आल्याचे सांगण्यात येते. काही खर्च अवाजवी असून नियमबाह्य झाल्याची चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com