#ZPElectionResults : शिवसेना खल्लास, एकच उमेदवार विजयी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 जानेवारी 2020

मागील कार्यकाळात शिवसेनेचे आठ सदस्य होते. आता राज्यात शिवसेना सत्तेत आहे. शिवसेना समर्थित आशिष जयस्वाल रामटेकचे आमदार आहेत. रामटेकचे खासदारसुद्धा कृपाल तुमाने हेसुद्धा शिवसेनेचे आहेत. रामटेक, मौदा परिसरात शिवसेनेचा चांगलाच जोर आहे. असे असताना एकच उमेदवार निवडूण आल्याने शिवसेनेला चांगलाच धक्का बसला आहे.

नागपूर : राज्यात महाआघाडीच्या सत्तेमुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादीला जिल्ह्याच्या राजकारण अच्छे दिन आले असले तरी मुख्यमंत्री असलेल्या शिवसेनेचे मात्र जिल्हा परिषदेतील अस्तित्त्व जवळपास संपुष्टात आले आहे. त्यांचा फक्त एकच उमेदवार निवडूण आला असून उपजिल्हा प्रमुख देवेंद्र गोडेबोले यांचा पराभव झाला आहे.

हे वाचाच - खिल्ला-या बैलांची गाडी गेली थेट न्यायालयात

मागील कार्यकाळात शिवसेनेचे आठ सदस्य होते. आता राज्यात शिवसेना सत्तेत आहे. शिवसेना समर्थित आशिष जयस्वाल रामटेकचे आमदार आहेत. रामटेकचे खासदारसुद्धा कृपाल तुमाने हेसुद्धा शिवसेनेचे आहेत. रामटेक, मौदा परिसरात शिवसेनेचा चांगलाच जोर आहे. असे असताना एकच उमेदवार निवडूण आल्याने शिवसेनेला चांगलाच धक्का बसला आहे.
रामटेक तालुक्‍यातील नगरधन येथून संजय झाडे हे एकमेव उमेदवार निवडूण आले. उपजिल्हा प्रमुख देवेंद्र गोडबोले चाचेर मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी कामठी मतदारसंघातून माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढण्याची तयारी दर्शविली होती. मौदा येथील एनटीपीसी औष्णिक ऊर्जा प्रकल्पातील नोकर भरतीवरून त्यांचा बाबनकुळे यांच्यासोबत मोदा वाद झाला होता. अधिकाऱ्यांना माराहाण केल्याने गोडबोले यांच्या विरोधात फौजदारी गुन्हासुद्धा दाखल करण्यात आला होता. सर्वांसोबत वैर घेणे गोडबोले यांना भोवले.

इच्छुकांना डावलल्याचा फटका

महाआघाडीचा प्रयोग जिल्हा परिषदेत करण्याचे ठरले होते. मात्र शिवसेनेने फारसा पुढाकार घेतला नाही. दुसरीकडे शिवसेनेने तिकीट वाटप करताना अनेक इच्छुकांना डावलले. त्यापैकी अनेकांनी प्रहारचा झेंडा हाती घेतला. त्याचा फटका शिवसेनेच्या उमेदवारांना बसला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #ZPElectionResults : Shiv Sena Khalsa, the only candidate won