धनगर समाजाच्या विकासासाठी एक हजार कोटी; मंत्री कुटे यांचा सत्कार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

धनगर समाजाच्या विकासासाठी 1 हजार कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल अमरावती येथे नुकताच पार पडलेल्या लाभ वाटप मेळाव्यात इमाव, साशैमाप्र, विजाभज व विमाप्र कल्याणमंत्री डॉ. संजय कुटे यांचा सत्कार करण्यात आला.

अमरावती : धनगर समाजाच्या विकासासाठी 1 हजार कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल अमरावती येथे नुकताच पार पडलेल्या लाभ वाटप मेळाव्यात इमाव, साशैमाप्र, विजाभज व विमाप्र कल्याणमंत्री डॉ. संजय कुटे यांचा सत्कार करण्यात आला.

2019-20 या आर्थिक वर्षासाठी एक हजार कोटी रुपये एवढा निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून या संदर्भातील राबवायच्या सर्व योजनांचे निकष, अटी शर्ती, आर्थिक तरतुदी आणि योजना राबवणारे विभाग असा शासन निर्णयही जाहीर करण्यात आला आहे. अमरावती विभागात डॉ. संजय कुटे आणि कृषिमंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे आणि आमदार सुनील देशमुख यांच्या उपस्थितीत नुकत्याच पार पडलेल्या कामगार विभागाच्या लाभ वाटप मेळाव्यामध्ये या शासन निर्णयाबद्दल धनगर समाज बांधवांना माहिती देण्यात आली. 

पहिल्या टप्प्यात दहा हजार घरकुल बांधकाम, मेंढ्या वाटप, मेंढी पालनासाठी बंदिस्त अर्ध बंदिस्त जागा विकत घेण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देणे, पावसाळ्यातील चार महिन्यांकरिता मेंढी पालनाकरिता चारा अनुदान, महिला सहकारी संस्थांसाठी 10 शेळ्या व एक बोकड वाटपाची योजना राबविण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1000 crore for the Solve issue of Dhangar community