
तुमसर : शहरात एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या संतापजनक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. अवघ्या ११ वर्षाच्या निष्पाप मुलीवर १६ मे रोजी अत्याचार झाल्याचे उघडकीस आले असून, या प्रकरणी तब्बल दोन आठवड्यानंतर ३० मे रोजी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.