
फुलसावंगी (जि. यवतमाळ) : येथे हळद विक्री करून लोणी (ता. किनवट जि. नांदेड) येथील घराकडे परतणाऱ्या मालवाहू वाहनाला अपघात (accident) होऊन १३ वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी फुलसावंगीपासून तीन किलोमीटरवरील राहुर रोडवर घडली. दारू पिऊन असलेल्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने (The vehicle lost control) हा अपघात होऊन त्याच्याच मुलाचा मृत्यू झाला तर चालक किरकोळ जखमी झाल्याचे बोलले जात आहे. या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. (13 year old boy died on the spot in the accident Yavatmal crime news)
नांदेड जिल्ह्यातील लोणी (ता. किनवट) येथील रहिवासी असलेले विजय दिगंबर गुंजकर हे हळद विक्री करण्यासाठी शनिवारी फुलसावंगी येथे आले होते. हळद विक्री केल्यानंतर ते मुलगा श्याम (वय १३) याच्यासोबत मालवाहू चारचाकी वाहनाने (क्रमांक एमएच २६ एडी ६५१२) लोणी येथील घराकडे निघाले. परंतु, फुलसावंगीपासून केवळ तीन किलोमीटर अंतरावरील राहुर रोडवर चालक विजय गुंजकर यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या खाली जाऊन उलटले.
या अपघातात चालकाच्या बाजूलाच बसलेला त्यांचा मुलगा श्याम हा जागीच ठार झाला तर चालक संतोष किरकोळ जखमी झाला. दरम्यान, या घटनेचे वृत्त गावात कळताच हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच फुलसावंगी बिटचे जमादार हगवाने यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
बापावर लक्ष ठेवण्यासाठी आईनेच पाठविले मुलाला
विजय गुंजकर यांना दारूचे व्यसन असल्याने ते नेहमीच दारू पितात. म्हणून फुलसावंगी येथे हळदविक्रीसाठी जाताना वडिलांवर लक्ष ठेवता येईल, म्हणून विजय यांच्या पत्नीने मुलगा श्याम याला फुलसावंगी येथे पाठविले होते. मात्र, त्यानंतरही विजयने दारू पिऊन वाहन चालविल्याने अपघात होऊन मुलाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
(13 year old boy died on the spot in the accident Yavatmal crime news)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.