मोबाईलच्या हट्टापाई 14 वर्षीय मुलाने घेतला गळफास

सतीश पुज्जलवार
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

पांढरकवडा : वडिलांनी मोबाईल अँड्राइड मोबाईल घेऊन न दिल्यामुळे निराश झालेल्या 14 वर्षीय मुलाने शेतात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील केळापूर येथे गुरुवारी (ता. 29) घडली असून जनमन व्यथित झाले आहे. सौरभ संतोष भोयर (वय 14) असे मृताचे नाव आहे.

सौरभ पाटणबोरी येथील छत्रपती शाळेत इयत्ता नववीत शिकत होता. त्याच्या वडिलांच्या नावाने झुंझारपूर येथील शेतशिवारात शेतजमीन आहे. लहान मुलं कोणत्या वेळी कोणता हट्ट करतील याचा नेम नाही. सौरभने त्याच्या वडिलांजवळ अँड्राइड मोबाईलसाठी हट्ट धरला होता. त्यांनी कापूस विकून मोबाईल घेऊन देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, आपला मुलगा मोबाईलसाठी इतकी टोकाची भूमिका घेईन याची पुसटशी कल्पनाही त्यांना आली नाही.

गुरुवारी सौरभ शाळेत न जाता आपल्या मोठ्या भावाला शिदोरी देण्यासाठी झुंझारपूर येथील शेतात गेला होता. भावाला डबा देऊन तो शेतात फिरू लागला. मात्र, जेवण आटोपल्यावर सौरभ दिसत नसल्याने मोठ्या भावाने त्याचा शोध घेतला. शेतातील अंजनाच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास लावलेल्या अवस्थेत सौरभचा मृतदेह आढळून आला. भावाने आरडाओरड करताच शेतातील इतर मंडळी त्याठिकाणी जमा झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडा येथे पाठवून दिला. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. 
 
Web Title: 14-year-old boy hang for mobile phones