Womens Safety : भद्रावती येथे १४ वर्षीय मुलीचा मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. कुटुंबीयांनी तिच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला असून, तपास सुरू आहे.
भद्रावती : शेतशिवारातील एका विहिरीत १४ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना शुक्रवारी (ता. २१) पहाटे पाच वाजताच्या सुमारास उघडकीस आली.