प्रवेशाच्या नावावर 18 लाखांनी फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 ऑगस्ट 2019

वर्धा : सेवग्राम येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशच्या नावावर मध्यप्रदेशतील विद्यार्थ्याची 18 लाखांनी फसवणूक झाल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणी दोन व्यक्तींविरोधात सेवाग्राम ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार सेवाग्राम येथील महाविद्यालयाच्या आवारात घडल्याने याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.

फसवणूक झालेल्या विद्यार्थ्याचे नाव गौरव राजेश मिश्रा रा. बरझर, मध्यप्रदेश असे आहे. गौरावला वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेकरिता आलेल्या परीक्षेत कमी गुण मिळाले होते. मात्र वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेण्याची इच्छा असल्याचे आरोपीच्या लक्षात आले. त्याने गौरवच्या वडिलांना 18 लाख रुपयांत प्रवेश देण्याचे आश्वासन देत फसवणूक केली. फसवणुकीची रक्कम आधी दहा आणि नंतर आठ लाख रुपये अशी दोन टप्प्यात स्वीकारण्यात आली.
एवढेच नाही तर, फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने मिश्रा यांच्याकडून संस्थेच्या नावे दोन लाख 94 हजार रुपयांचा धनादेश घेतला. तसेच रोख मिळाल्याचे लेखी दिले. या पत्रावर संस्थेचा शिक्का असल्याने त्यावर मिश्रा यांचा विश्वास बसला. हा व्यवहार संस्थेच्या आवारात झाल्याने यात संथेचे कर्मचारी सहभागी असल्याचा आरोप राजेश मिश्रा यांनी केला आहे.

कस्तूरबा हेल्थ सोसायटिमधे असे प्रकार होत नाही. या प्रकरणी पोलिसात तक्रार झाली आहे. कायदा आपले काम करेल. यात जर संस्थेचा कर्मचारी सहभागी असेल तर त्याच्यावर नक्कीच करवाई होईल.
- बी. एस. गर्ग
सचिव, कस्तूरबा हेल्थ सोसायटी, सेवाग्राम, जि. वर्धा

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 18 lakhs fraud in the name of admision