
तुमसर : मागील काही दिवसांपासून तुमसर हे जिल्ह्यात चर्चेचे केंद्र ठरले आहे. तुमसर येथील एका तरुणाच्या खात्यात एक कोटी ८० लाख रुपये जमा झाले. याची माहिती गुजरात पोलिसांना लागली. थेट गांधीनगर येथून गुजरात पोलिस तुमसर येथे दाखल होऊन त्या तरुणाला चौकशीकरिता गांधीनगर येथे घेऊन गेले. या घटनेने तुमसर शहरात एकच खळबळ माजली.