Electric Shock: पांगरीतील वीस वर्षीय राहुल राठोडचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, कुटुंबावर दु:खाचा डोंगर
Yavatmal News: यवतमाळ जिल्ह्यातील पांगरी गावात वीजेचा धक्का लागून २० वर्षीय राहुल नामदेव राठोड याचा मृत्यू झाला. अचानक झालेल्या या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आर्णी (जि. यवतमाळ) : तालुक्यातील पांगरी येथील वीस वर्षीय तरुण राहुल नामदेव राठोड याचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता. ६) सायंकाळी आठ दरम्यान घडली. बुधवारी पांगरी येथील राहुल राठोड याला विजेचा जोरदार झटका बसला.