Chandrapur News : सलग दोनशे दिवस वीजनिर्मिती; चंद्रपूर महाऔष्णीक वीज केंद्र, चौदा वर्षानंतर विक्रम

महाऔष्णीक वीज केंद्राच्या पाचशे मेगावॅटच्या संच क्रमांक आठमधून सलग दोनशे दिवस वीजनिर्मिती झाली.
200 days electricity generation recorded after 14 years chandrapur electric center
200 days electricity generation recorded after 14 years chandrapur electric centerSakal
Updated on

चंद्रपूर : महाऔष्णीक वीज केंद्राच्या पाचशे मेगावॅटच्या संच क्रमांक आठमधून सलग दोनशे दिवस वीजनिर्मिती झाली. चंद्रपूर महाऔष्णीक वीज केंद्रात तब्बत १४ चौदावर्षांनी एखाद्या संचाने सलग दोनशे दिवस राहून वीजनिर्मिती केल्याचा हा विक्रम आहे.

महाऔष्णिक विद्युत केंद्र हे सध्यास्थितीत २९२० मेगावॅाट स्थापीत क्षमता असलेले वीज निर्मिती केंद्र आहे. या वीज केंद्रामध्ये ५०० मेगावॅटचे पाच संच आणि २१० मेगावॅटचे दोन संच कार्यान्वीत आहेत. महाराष्ट्राला नियमित आणि स्वस्त दरात वीज पुरवठा करण्यात चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मोठे योगदान आहे.

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र वीज निर्मिती क्षेत्रात नेहमीच महत्वाची व उल्लेखनिय कामगिरी करत असते. या विद्युत केंद्रातील संच क्रमांक आठने अनेकदा नवीन विक्रम केले आहे. त्यातच अजून एक नवीन भर घालत सातत्याने २०० दिवस वीज निर्मिती करण्याचा एक महत्त्वाचा टप्पा गाठलेला आहे.

संच क्रमांक आठने १० मे २०२३ पासून आजपर्यंत सातत्याने २०० दिवस अखंडपणे वीज निर्मिती करत नवीन विक्रम स्थापीत केला आहे. संच क्रमांक आठ हे चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या इतिहासात दोनशे दिवस सतत कार्यरत राहणारे दुसरे संच आहे. या आधी २००९ या वर्षी संच क्रमांक तीनने सातत्याने २०० दिवस सतत वीज निर्मिती करण्याचा विक्रम स्थापीत केला होता. त्यानंतर तब्बल १४ वर्षानंतर हा टप्पा संच क्रमांक ८ ने गाठलेला आहे.

चंद्रपुर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता गिरीश कुमरवार यांनी सर्वांचे अभिनंदन केले. संच क्रमांक आठच्या चमुच्या मेहनतीमुळे व कार्याप्रती समर्पणामुळेच हा टप्पा गाठता आला असा उल्लेख त्यांनी केला. महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अनबलगन, संजय मारुडकर संचालक (संचलन), डॉ. धनंजय सावळकर संचालक (खनिकर्म), बाळासाहेब थिटे संचालक (वित्त),

अभय हरणे संचालक (प्रकल्प), पंकज सपाटे, कार्यकारी संचालक (संवसू-२), डॉ. नितीन वाघ कार्यकारी संचालक (पर्यावरण व सुरक्षितता) आणि राजेश पाटील कार्यकारी संचालक (संवसू-१) यांनी या प्रसंगी संच क्र. ८ मध्ये कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com