Ashadi Wari : आषाढीसाठी अकोला आगारातून २०० ‘विठाई एक्स्प्रेस’ धावणार‎! १५ जूनपासून विशेष बस

Vithai bus
Vithai bus

अकोला : पंढरपूर येथील आषाढी वारीसाठी‎ अकोला एसटी विभागाने २०० वारी विशेष ‘विठाई एक्स्प्रेस’ गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे नियोजन करण्यात आले असून, १५ जून ते ५ जुलैदरम्यान अकोला स्थानकावरून या गाड्या सोडण्यात येणार आहेत. तयारी‎ केली आहे.

यावर्षी ता. २९ जून रोजी आषाढी‎ एकादशी आहे. उत्सवासाठी पंढरपूर‎ येथील विठुरायाच्या दर्शनासाठी‎ अकोला जिल्ह्यातील लाखो भाविक जातात. जिल्ह्याच्या विविध भागातून निघणाऱ्या पालख्यांसोबतही‎ भाविक पायी पंढरपूरला जातात.‎ पायी जाणाऱ्या वारकऱ्यांसह‎ वाहनांद्वारे जाणाऱ्यांचीही संख्या‎ मोठी असते. त्यामुळे एसटी बसवर प्रवाशांची गर्दी होते.

गर्दीच्या काळात भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटीच्या अकोला विभागाने वारीसाठी विशेष बस गाड्यांचे‎ नियोजन केले आहे.‎ वारीसाठी जाणाऱ्या भाविकांना वेळेत पोहोचता यावे म्हणून ता. १५ जूनपासून पंढरपूरकडे‎ गाड्या सोडण्यात येणार आहे. वारीनंतर ५ जुलैपर्यंत परत येणाऱ्या प्रवाशांची संख्या बघता बस सोडण्यात‎ येणार आहे. अकोला विभागात‎ एकूण नऊ आगार आहेत. या नऊ आगारातून‎ एकूण २०० बस प्रवाशांसाठी‎ उपलब्ध करून देण्यात येणार‎ आहेत.‎

‘ना नफा ना तोटा’ पद्धतीने सोडणार बस

पंढरपूर यात्रेसाठी एसटी महामंडळाकडून ‘ना नफा ना तोटा’ या तत्‍वावर‎ बस सोडण्यात येणार आहे. बसच्या क्षमतेपेक्षा ७५‎ टक्केच प्रवाशांनी एखाद्या‎ बसमधून प्रवास केला तर, ना नफा‎ तोटा या पद्धतीने बस चालते.‎ अर्थात महामंडळाचा ब्रेक- इव्हन‎ ७५ टक्के लोड फॅक्टरवर आहे.‎ त्यामुळे यात्रेच्या काळात लोड‎ फॅक्टर त्यापेक्षा कमी येणार नाही,‎ तसेच महामंडळाचे नुकसान‎ होणार नाही, याची दक्षता घेतली‎ जाणार आहे.‎

सर्व सवलती राहणार लागू

पंढरपूर यात्रेकरिता यावर्षी २०० गाड्यांचे‎ नियोजन केले आहे. या गाड्यांमध्ये एसटीतर्फे प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सर्व सवलती लागू राहणार आहेत. सध्या‎ एसटीमध्ये ७५ वर्षांवरील‎ नागरिकांना मोफत प्रवास आहे.‎ तसेच महिलांना तिकिटात ५० टक्के‎ सवलत आहे. यामुळे या वर्गाची‎ संख्या वाढण्याची शक्यता आहे.‎ याचा विचार करून यंदा बस‎ गाड्यांमध्ये वाढ करण्यात आली‎ आहे.‎ गतवर्षी वर्षी १७७ गाड्या आषाढी‎ वारीसाठी पंढरपूरकडे सोडण्यात‎ आल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com