
यवतमाळ : भरधाव दुचाकी दुभाजकाला धडकल्याने एक २२ वर्षीय युवक गंभीर जखमी झाला होता. अखेर त्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता. १७) सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास कळंब-नागपूर महामार्गावरील कामठवाडा उड्डाणपुलाजवळ घडली. शुभम संतोष मडावी (वय २२, रा. तकिया धंतोली, नागपूर) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.